जळगाव : प्रतिनिधी अंगझडती घेण्याचा राग आल्याने कैद्याने कारागृहातील पोलीस शिपायावर शिवीगाळ अरेरावी करत हल्ला करत स्वत:वरही वार करून घेतल्याची धक्कादायक घटना काल २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव जिल्हा कारागृहात घडली. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान कारागृहातील या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृहात पोलीस शिपाई राम घोडके हे सुभेदार सुभाष खरे, कुलदीपक दराडे, निवृत्ती पवार, नीलेश मानकर, रामचंद्र रोकडे, सीताराम हिवाळे हे काल बुधवारी सायंकाळी ६ वाजता बॅरेकमध्ये जाऊन कैद्यांची अंगझडती घेत होते. यादरम्यान एका बॅरेकमध्ये कैदी सचिन दशरथ सैंदाणे याची अंगझडती घेण्यासाठी गेले. त्याने अंगझडतीत विरोध…
Author: saimat team
बोदवड – प्रतिनिधी सेवा संघर्ष समिती बोदवड च्या वतीने सालाबादप्रमाणे २३ फेब्रुवारी ला संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान रँलीचे अयोजन केले जाते मात्र यावेळी रैली ला मनाई होती त्या करीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संत गाडगेबाबा याचे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता , कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नगराध्यक्ष श्री आनंदा भाऊ पाटील यांनी मल्यार्पण केलेत त्या नंतर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमे उपनगराध्यक्ष श्री संजू भाऊ गायकवाड यांनी माल्यार्पण केलेत व बाहेरपेठेतील मुख्यरस्त्याने स्वच्छता करीत स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्या वेळी सेवा संघर्ष समिती चे अध्यक्ष शांताराम कोळी,नगर सेवक सईद दादा बागवान ,नगर सेवक विजय…
यावल ( सुरेश पाटील) तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायतीत 6 लाख 99 हजार 374 रुपयाचा अपहार केल्याची तक्रार संबंधित अधिकार्यांकडे किनगाव येथील रामचंद्र दाजीबा पाटील यांनी केली होती परंतु तक्रारीची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी न घेता चौकशी व कार्यवाही न केल्याने यावल न्यायालयात तक्रार दिल्याने यावल न्यायालयातर्फे यावल तहसीलदार,बिडिओ,पोलीस,ग्रामसेवक,सरपंच यांची चौकशी होणार आहे.याबाबत यावल न्यायालयाने दि.17 फेब्रुवारी 2022 रोजी चौकशीचे आदेश दिल्याने यावल तालुक्यातील महसूल,पोलीस, पंचायत समिती कार्यक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायत मध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत तीन कामे केल्याचे दर्शवून नी विधीप्रमाणे कामे न करता अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे करून सर्व कामाची…
पाचोरा- गणेश शिंदे ” जीवनात नेहमी नकारात्मक विचारांपासून लांब राहिले पाहिजे. युवकांनी मोठी स्वप्न बघायला शिकणे आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ध्येयाचा व्यासंग बाळगणे महत्त्वाचे आहे. अभ्यासात गोडी निर्माण करण्याबरोबरच कष्ट करण्याची क्षमता निर्माण करणे म्हणजे चांगला रोजगार निर्माण करणे होय” असे प्रतिपादन प्रा. गोपाल दर्जी यांनी केले. येथील अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा पाचोरा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला 2022’ चे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना जळगाव येथील दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गोपाल दर्जी यांनी श्रोत्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. पाचोरा येथील अखिल भारतीय मराठा महासंघ यांचे तर्फे ही शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला…
मलकापूर(सतीश दांडगे) : येथील एचडीएफसी बँकेचे कॅशीयर वैभव रमेश देशमुख वय 30 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येवुन माहिती दिली की , दि. 21/02/2022 रोजी दुपारी 2.30 वा दरम्यान इरफान हनीफभाई पटनी मुळ रा.सुमरा सोसायटी रामनगर , गोंदल राजकोट गुजरात सद्या वडनेर भोलजी हा इसम एचडीएफसी बँक शाखा मलकापुर येथे कॅश भरणा करण्यासाठी गेला व बोहरा इंडस्ट्रीयल ऑईलचे अकाउंटवर भरणा करण्यासाठी स्लिप भरुन रक्कम कॅशीयरकडे दिली . कॅशीयरने नोट सॉरटींग मशीन मध्ये सदर इसमाने दिलेल्या 2000 , 500 , 200 व 100 रुपये दराच्या नोटा काउंट करीत असतांना 500 रुपये दराच्या नोटापैकी 38 नोटा रिजेक्ट बॉक्समध्ये आल्याने सदर नोटा त्यांनी चेक…
पहूर. ता. जामनेर येथून जवळच असलेल्या कुंभारी बुद्रुक येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभारी बुद्रुक तालुका जामनेर येथील आसाराम रानु जोशी वय 58 यांच्यावर बँकेचे तसेच विविध कार्यकारी सोसायटी चे कर्ज होते त्यातच विविध कार्यकारी सोसायटी चे कर्मचारी गेल्या दोन-तीन दिवसापासून वसुलीसाठी तगादा लावत होते .तर बँकेचे कर्ज असल्याने या कर्जास कंटाळून शेतकरी आसाराम राणू जोशी वय 58 राहणार कुंभारी बुद्रुक तालुका जामनेर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर शेतकऱ्याची परिस्थिती नाजूक असून त्यांना शासनाची कुठली सूट न मिळाल्याने सदर…
यावल (सुरेश पाटील) मंगळवार दि.२२ फेब्रुवारी रोजी यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान दाहावे टप्प्यात पोहोचले असून या उपक्रमाला चितोडा गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील चितोडा गावातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा या करीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास दहावे सत्राला सुरुवात करण्यात आली या अभियान ग्रामपंचायत जवळ चितोडा येथे घेण्यात आले.या अभियानास एकूण ३४६ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला.यावेळी मोफत ई-श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ.कुंदन दादा फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सौ.सलिमाताई तडवी (सरपंच ),सौ.भावनाताई…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीवर सकाळी जिवंत अवस्थेत आढळलेला बिबट्या वाघाने सायंकाळी कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीवरच प्राण सोडल्याची घटना बुधवारी जरंडी (ता.सोयगाव)शिवारात उघडकीस आली आहे.सकाळी आढळलेला बिबट्या जिवंत असल्याची चर्चा मजुरांमध्ये असून मात्र या बिबट्याने औरंगाबादचे पथक पोहचण्याच्या आधीच प्राण सोडल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकारामुळे सोयगाव परिसरात खळबळ उडाली आहे.वनविभागाच्या औरंगाबाद येथील शीघ्र कृतीदलच्या पथकाने मृत बिबट्याचे शव शवविच्छेदनासाठी हलविले आहे.मात्र अद्यापही बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नसल्याची माहिती वनविभागाकडून सांगण्यात आलेली आहे. जरंडी(ता.सोयगाव)गावालगत असलेल्या कोल्हापुरी शिवारात काही शेतमजुरांना बिबट्या वाघ आढळून आला,सदरील बिबट्या वाघ हा अत्यवस्थ अवस्थेत जिवंत असल्याची माहिती वनविभागाला परिसरातील मजुरांनी दिली.घटनेची माहिती मिळताच सोयगाव वनविभागाचे…
मनवेल ता.यावल : (वाघोदा ता.यावल) येथील ३५ वर्षीय युवकाने पाटाच्या कालव्या जवळ साकळी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सांयकाळी उघळकीस आली. वाघोदा ता.यावल येथील जगदीश हिरामण पाटील वय ३५ असे मयत युवकाचे नाव आहे. मी माझा वैयक्तिक आयुष्याला कंटाळुन आत्महत्या करीत असल्याने कुणाच्या काहीही एक संबध नसून कुणाला त्रास होईल असे वागु नये हि विंनती अशी सुसाईड नोट लिहुन युवकाने आत्महत्या केली आहे.या तरुणाच्या मृत्यूने वाघोदा गावात हळहळ व्यक्त होत आहे.