Author: saimat team

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला ,विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. ध्वजारोहन ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन भाऊ फालक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन महेश भाऊ फालक, सचिव विष्णू भाऊ चौधरी, प्रकाश शेठ फालक, संचालक निळकंठभारंबे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, प्रधानाचार्य नीना कटलर , उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ. बी एच बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. एन. ई भंगाळे, उपप्राचार्य डॉ. ए डी गोस्वामी, उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे, पर्यवेक्षक श्रीमती शोभा तळेले, आदी मान्यवर उपस्थित होते. संविधानाचे करण्यात आले वाचन ध्वजारोहन करण्याच्या पूर्वी शासकीय आदेशानुसार संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन डॉ.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष मा.दिपक सुर्यवंशी आणि अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष साबीर गुड्डू पठाण यांनी जिल्हा कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी अफसर अब्दुल हमीद, सय्यद युनूस सय्यद अमीर तसेच सरचिटणीस पदी वसीम शेख इस्माईल व चिटणीस पदी अब्दुल हमीद अब्दुल रउफ यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक २६ जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ, अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष साबीर गुड्डू पठाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी आणि अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष साबीर गुड्डू पठाण यांनी जबाबदारी स्वीकारलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदीच्या अल्पसंख्यांक समाज व युवकासाठी सुरु…

Read More

चोपडा, प्रतिनिधी । जिवन क्षणभंगुर आहे. याची प्रचिती आपणास परमेश्वर वारंवार देत असतो तरी मनुष्य लोभाच्या जाळ्यात इतका अडकतो की, तो मरेपर्यंत माझे माझे करत असतो.कोरोना काळात आपलेच आपले होत नव्हते. मनुष्याला आपली खरी किंमत कळाली. तरीही मनुष्य हा आपल्या जीवनात बदल करून घेत नाही.साधूसंत नेहमीच आपणास सूचित करत असतात की, धर्म शिवाय तुमच्या सोबत काहीच येणार नाही त्यांनी जीवनात धर्माचे स्थान, वेळेचे महत्व आणि गुरु आशीर्वादाचे महात्म्य सांगत त्यांनी आपल्या जीवनाला गुरूच्या आशिर्वादाने कशी कलाटणी मिळाली ते सांगितले. आणि त्याचमुळे वेळेचे महत्त्व कळाले म्हणून उतरत्या वयातही दीक्षा घेण्याचे दृढ संकल्प मी केला आहे.असे विचार सत्कार व सन्मान प्रसंगी श्रीमती…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी वातावरणात बदल झाल्याने गायब झालेला थंडीचा जोर आठवडाभरापासून अचानक वाढल्याने सोयगावसह परिसर थंडीने गारठला आहे त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे जॅकेट, स्वेटर, मफलर, कानटोपी आदी उबदार कपडे वापरण्यास सुरुवात केली आहे तर या वाढलेल्या गारठ्यामुळे नागरीक शेकोटीची आसरा घेत आहेत थंडी पासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध मार्ग अवलंबत आहेत यंदा चांगला पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे गहू ,हरभरा ज्वारी, मका पिकांची परिसरात मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली असून थंडीचे प्रमाण जास्त वाढल्याने शेतकरी चांगला सुखावला आहे परिसरात वयोवृद्ध नागरिक शेकोट्या चा सहारा घेत आहेत काही दिवसात वातावरणात बदल झाल्याने समाधान व्यक्त होत…

Read More

जळगाव प्रतिनिधी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले जळगाव जिल्ह्यातील स्तिथी. जिल्हा कोविड  रुग्णालयाने दिलेल्या अहवाल आज दिवसभरात ३३८  कोरणा बाधित नव्याने आढळून आले आहे तर ४०९  जण कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहे. तालुक्यातील  आकडेवारी याप्रमाणे जळगाव शहर ५५  जळगाव ग्रामीण १२  भुसावळ ३०  अमळनेर ११  चोपडा २४  पाचोरा 0  भडगाव ३१  धरणगाव ७  यावल २२  एरंडोल १५  जामनेर १  रावेर ७  पारोळा २६  चाळीगाव ६७  मुक्ताईनगर ११  बोदवड ९  आणि इतर जिल्ह्यातील सात असे एकूण ३३८  आढळून आलेले आहे. सध्या जिल्ह्यात तीन हजार ५६२  कोरोना  रुग्ण विविध कोविड  सेंटर मध्ये उपचार घेत आहे.

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी अजिंठाहे जागतिक पर्यटनस्थळ तर आहेच येथे येत असलेल्या पर्यटकांना तसेच पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून काय काय उपाय योजना कराव्या लागतील व येथे धावत असलेल्या बसेस ऐवजी इलेक्ट्रीक बसेस चालविता येईल का या बाबत आम्ही विचार करत असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जगप्रसिद्ध अजिंठा येथील व्ह्यू पाईन्टच्या परिसराची पाहणी दरम्यान केली. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील व्ह्यू पाईन्ट येथे सायंकाळच्या सुमारास भेट देऊन पाहणी केली.या दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की अजिंठा हे जागतिक पर्यटनस्थळ आहे येथे येणाऱ्या पर्यटकांना तसेच पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून काय काय उपाय योजना…

Read More

जळगाव :  कळविण्यास अत्यंत दुःख होते की श्री शिवाजी देवाजी कुंभार यांचे पिताश्री कै.वा.देवाजी विठोबा कुंभार आज दिनांक. 27/01/2022 रोजी सायंकाळी 7:00 वा .निधन झाले.तरी त्यांची अंत्ययात्रा दि28/01/2022 वार शुक्रवार वेळ.सकाळी 12:00 वा येथील राहत्या घरापासून निघेल त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

Read More

जळगाव : शहरातील नवीन बी. जे. मार्केट मेकॅनिकल असोसिएशनतर्फे तेथील 20 दुचाकी मेकॅनिकलना काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते डस्टबिन व झाडू वाटप करण्यात आले. संबंधित ठिकाणी दिवसभर मेकॅनिकलकडून दुचाकी वाहनांची दुरुस्ती व त्यांच्यात नव्याने स्पेअरपार्ट बसविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात असल्याने प्लास्टिक कचरा तसेच इतर घाण विखुरलेल्या स्वरूपात साचत असते. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दुचाकी मेकॅनिकलना काल सकारात्मक भावनेतून डस्टबिन व झाडू वाटप करण्यात येऊन त्यांना दिवसभरातील सर्व कचरा व घाण त्यात टाकून त्याची घंटागाडीच्या माध्यमातून दररोज विल्हेवाट लावली जावी.…

Read More

जळगाव : जागतिक कृषी महोत्सव-2022 अंतर्गत शहरातील मोहाडी रोडवरील स्वामी समर्थ मंदिर परिसरात आयोजित विभागीय कृषी महोत्सव कार्यस्थळी काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पूर्वीप्रमाणे उत्पादन काढल्या जाणार्‍या अर्थात सेंद्रिय शेती अंतर्गत बाजरी, नागली व ज्वारी यांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. तसेच त्या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रातर्फे आयोजित नेत्र तपासणी, हाडांची तपासणी, दंत तपासणी यासह पर्यावरण प्रकृती विभागातर्फे आयोजित वृक्षारोपण, बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून आयोजित विविध सांस्कृतिक व देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रमालाही भेट दिली. याप्रसंगी कृषी महोत्सवाचे जिल्हा प्रतिनिधी श्री.निकम साहेब, कृषी प्रतिनिधी श्री.पी.के.पाटील, पर्यावरण प्रतिनिधी श्री.वसंत पाटील,…

Read More

जळगाव : शिवसेना व रोटरॅक्ट क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी ‘कोरोना’ काळात गौरवास्पद कामगिरी करणार्‍या जळगाव शहर पोलिस ठाण्यातील निरीक्षक श्री. विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह कर्मचार्‍यांचा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते प्रशस्तिपत्र व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर) श्री.विष्णू भंगाळे तसेच रोटरॅक्ट क्लब जळगावचे पदाधिकारी व शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More