Author: saimat team

मुंबई :   सर्वोच्च न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे  यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज ते जिल्हा न्यायालयात हजर झाले आहेत. गुरुवारी संतोष परब   यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज  सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्याचवेळी खालच्या न्यायालयात हजर व्हा, असे स्पष्ट आदेश दिले होते. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत होते. मात्र, चौकशीला ते सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करणे गरजेचे आहे. तसेच अधिक तपासासाठी वेळ हवा, अशी पोलिसांनी मागणी होती. मात्र, त्यानंतर नितेश राणे अज्ञातस्थळी होते. त्यानंतर त्यांनी अटकूपर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी   आज रोजी महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना २ लाखाच्या वरील कर्जधारक व रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावे यासाठी जामनेर तहसीलदार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज निवेदन दिले. महाराष्ट्र सरकार द्वारे सन २०१९ -२०मध्ये  महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जाहीर घोषणा करण्यात आली होती या योजनेत समस्त कर्जबाजारी शेतकरी यांना लाभ मिळणार असल्याच्या मोठं मोठ्या वल्गना या सरकार द्वारे करण्यात आल्यात यात प्रामुख्याने महात्मा फुले यांच्या नावाने घोषित केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा २ लाख रु च्या आतील कर्जधारक यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली तसा शासनाने जि आर देखील काढला होता मात्र त्या सोबत २ लाखापेक्षा…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । बुधवारी २६ जानेवारीला आपल्या देशात ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने देशभरात देशभक्तीशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावर यासंबंधी अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. यामध्ये भारतीय सैन्याचा जवानांचे अनेक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आयटीबीपीच्या जवानाने गायले देशभक्तीपर गीत अशातच एक व्हिडीओ लोकांचं मन जिंकतोय. हा व्हिडीओ एका सैनिकाचा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP)ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सैन्याचा एक जवान देशभक्तीपर गाणे गाताना दिसत आहे. लष्कराच्या या जवानाने गायलेले गीत ऐकून तुमचेही डोळे पाणावतील. व्हिडीओमध्ये हा जवान मोहम्मद रफ़ी यांनी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनी जिल्हाभरात विविध तालुकास्तरावर गावा- गावा मध्ये 135 ठिकाणी अभाविपतर्फे तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यावेळी सपूर्ण जिल्हाभरात प्रजासत्ताक दिनापासून ते आगामी काळात 30 जानेवारी पर्यंत १७५ पदयात्रा काढण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर अभाविप जळगाव मध्ये १७५ तिरंगा पदयात्रा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिवसभरामध्ये अभाविपतर्फे जळगाव जिल्ह्यात विविध तालुका तसेच विविध ग्रामीण भागात 135 तिरंगा पदयात्रा काढण्यात आल्या. जळगाव, धरणगाव, अमळनेर, पाचोरा, पारोळा, खेडी, हरेश्वर पिंपळगाव, कानळदा,विद्यापीठ आदी गावांमध्ये प्रत्यक्ष…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ३७४ कोरोनाबाधित नव्याने आढळून असून तर ४६८ कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. जळगाव शहर-४१, जळगाव ग्रामीण -१६, भुसावळत-४५, अमळनेर-४३, चोपडा-७९, पाचोरा-१५, भडगाव-१५, धरणगाव-०, यावल-३१, एरंडोल-१, जामनेर-८, रावेर-१०, पारोळा-६, चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकूण ३७४ रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४९ हजार ७११ कोरोना बाधित आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४३ हजार ६५९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार ४६७ कोरोना रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २…

Read More

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेले.घरातील व्यक्ती उठल्याचे पाहून चोरटे पसार झाले.या प्रकरणी शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, अरूण कालुसिंग पाटील रा. मनवेल ता.यावल जि.जळगाव हे दोन मुले आणि सुन यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवार २७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता सर्वजण जेवण करून झोपले.मध्यरात्री अज्ञात दोन चोरट्यांनी घराचा कडीकोडा तोडून घरात घुसून अरूण पाटील यांच्या बेडरूममध्ये असलेल्या…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पुर्ततेसाठी २७ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यस्तरावर सुरु असलेल्या “दुखवट्यास ” पाठींबा देऊन भुसावळ आगारातील एस.टी.कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पार्टी, भुसावळ यांच्या वतीने खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या स्वखर्चातून संसारपयोगी किराणा किटचे वाटप करण्यात आले. एस.टी. महामंडळाच्या तुटपुंज्या व अनियमित वेतनामुळे राज्यातील अनेक एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे, त्यात कोरोना नंतर आत्महत्यांमध्ये बरीच वाढ झालेली असून, त्यासाठी आर्थिक मागण्यांच्या पुर्ततेसाठी सुरु असलेल्या दुःखवट्याला इतके दिवस उलटूनही राज्य शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. याचा यावेळी भारतीय जनता पार्टी, भुसावळ यांच्यावतीने खेद व्यक्त करण्यात येऊन राज्यतील मविआ सरकारचा निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टी…

Read More

यावल, प्रतिनिधी । आज शुक्रवार रोजी डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण क्षेत्रातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा,याकरीता अत्यावश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास तिसऱ्या सत्राला सुरुवात करण्यात आली हे अभियानाचे तिसरे सत्र अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवानी सुद्धा या अभियानाला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. या अभियानास हरीपुरा व मोहराळा असे दोन गावातील नागरिकांचा समावेश होता सदर अभियान ग्रामपंचायत कार्यालय समोर मोहरळा तालुका यावल येथे आदिवासी बांधवांचे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियान तिसऱ्या टप्यात पोचले.सदर अभियानास एकूण 369 लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला. यावेळी गावातील सरपंच नंदा महाजन यांनी व उपसरपंच जहागीर तडवी यांनी डॉ. कुंदन फेगडे…

Read More

फैजपूर प्रतिनिधी (उमाकांत पाटील सर)  फैजपूर पोलिसांनी यावल किनगाव मार्गावर हॉटेल जलसा शेजारी मोकळ्या जागेत बेकयादेशीर देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्या तरुणाला अटक,त्याच्याकडून ८ हजार ९०० रुपये किमतीचा माल हस्थागत केला असून.यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फैजपूर  पोलीस ना मिळालेल्या गोपनीय  माहिती नुसार हॉटेल जलसा शेजारी मोकळ्या जागेत संशयित आरोपी दीपक मधुकर माळी (वय – ३७ , रा .फुले मुजुमदार नगर, साखळी ता.यावल ) हा बेकायदेशीर देशी व विदेशी दारूची विक्री करत आहै . गुरवारी दुपारी उपविघागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे याच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक फोजदार प्रमोद चौधरी, अविनाश चौधरी आणि पो कॉ सुमित बाविस्कर यांनी संशयित…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकाने यांमध्ये वाईन विक्री करता येईल, असा निर्णय घेतला आहे. या समाजघातक निर्णयाचा सनातन संस्था जाहीर निषेध करते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी शेकडो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि सहस्रो मावळ्यांच्या पराक्रमाने पुनीत झालेली भूमी मद्यप्यांची भूमी म्हणून म्हटली गेल्यास त्याचे पातक सरकारला लागेल. सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासणारा हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे. पंजाबमधील युवापिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे, त्यावर ‘उडता पंजाब’सारखा सिनेमाही आला. हे वास्तव पहाता महाराष्ट्राने सजग होऊन खरेतर राज्य ‘दारूमुक्त’, ‘व्यसनमुक्त’ होण्यासाठी सरकारने…

Read More