Author: saimat team

चोपडा ः प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात राहणार्‍या चव्हाण कुटुंबियांची सुकन्या आणि एरंडोल तालुक्यातील कासोदा या गावातील सूर्यवंशी परिवाराची सून असलेली दीपिका चव्हाण-सूर्यवंशी सध्या ग्रँड पेरी, अल्बर्टा, कॅनडा येथे स्थायिक झालेल्या आहेत. दि.२७ जुलै रोजी कॅनडातील एडमिंटन शहरात घेण्यात आलेल्या ‘व्हॉइस ऑफ एडमिंटन’ या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत दीपिका हिने सहभाग घेतला होता. जवळपास तीन महिने चाललेल्या या स्पर्धेत दीपिका हिने स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आणि ‘व्हॉंईस आँफ एडमिंटन’ या स्पर्धेच्या पारितोषिकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेनंतर दीपिकाला पार्श्‍वगायिका म्हणून मिळालेल्या अतिशय सुंदर गाण्यांचे दीपीकाच्या सुरेल आवाजात व्हिडिओ ट्रॅकच्या आधारे रेकॉर्डिंग नुकतेच झाले असून ते २ डिसेंबर २०२० रोजी ‘एसएमआर एन्टरटेन्मेंट यू-ट्युब चॅनल’…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांनी कोविड-१९ अंतर्गत कार्यरत असणारे भुसावल ग्रामीण रुग्णालयाची कोविड सेवा ३० नोव्हेंबरला संपुष्टात येत असून फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, उपजिल्हा रुग्णालय, विमानतळ जळगाव, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा वॉररूम जळगाव फक्त कोविड सेवा सुरू राहणार आहे, असे नमूद केले. आता यावल, रावेरसह भुसावळ तालुक्यासाठी जळगाव हेच सेन्टर राहील. तेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोरोनाचे संशयित किंवा संक्रमित रुग्ण परंतू ज्यांना कुठलाही त्रास नाही. ज्यांना घरी विलगीकरण होण्याची सोय नाही अशा रुग्णांसाठी तरी ग्रामीण रुग्णालयात क्वॉरंटाईन सेंटर भुसावळ येथे सुरू ठेवावे, अशी मागणी भाजपा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी उपमहापौर आपल्या दारी अभियानामूळे महापालिकेच्या विविध विभागांच्या कामांत सुधारणा घडून आल्या असून, रस्ते परिसर झाडून स्वच्छ होत आहेत. रस्त्यांवरील खडडे मुरूमाने बुजली जात आहेत. प्रभाग क्रं. ७ च्या विविध भागांचा उपमहापौर सुनिल खडके यांनी धावता दौरा केला. अजय कॉलनी, निशांत बिल्डींग परिसर, संगम सोसायटी, हर्ष रेसिडेन्सी गल्ली, मित्र नगर, गुरुदत्त कॉलनी, गणेश कॉलनी- शिव कॉलनीचे काही भाग यांना भेटी देऊन तेथील स्वच्छता आदी नागरी सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली. दौर्‍यात स्थायी समितीच्या माजी सभापती ड शुचिता हाडा, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना भरत सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, अतिक्रमण सभापती किशोर बाविस्कर नगरसेविका दिपमाला काळे,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कडगाव येथील ग्रामसेवक कुंदन कुमावत यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी काही ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने करीत गटविकास अधिकारी एस. बी. सोनवणे यांना निवेदन दिले. तालुका कॉग्रेस कमिटीने याकामी पुढाकार घेतला. कुमावत यांनी नियमबाह्य कामास विरोध केल्याने पोलिस पाटलासह काही पदाधिकार्‍यांनी ग्रामसेवकांना धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. कुमावत हे गावात विविध योजनांचे काम करीत असताना त्यांना विरोध केला जात आहे. त्यामुळे पंचायत समितीने दबावाखाली न येता नियमाप्रमाणे काम करणार्‍या ग्रामसेवकांची बदली करू नये, त्यांना गावातच पुर्ननियुक्ती द्यावी अशी मागणीही निवदेनकर्त्यांनी केली. या वेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, मुरलीधर सपकाळे, प्रमोद घुगे, धनराज जाधव, रवींद्र कोळी, शिवदास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कोविड-१९च्या आपत्ती काळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेतील सात विद्यार्थ्यांची गुजरात राज्यातील दहेज येथील नोसिल लिमिटेड कंपनीमध्ये ऑनलाईन मुलाखतीव्दारे निवड करण्यात आली. विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत गेल्या २५ वर्षांपासून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. या संस्थेत शिकणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीव्दारे नोकरीची नामांकीत कंपनीमध्ये संधी मिळाली आहे. सद्यस्थितीत कोरोना प्रार्दूभाव लक्षात घेता परिसर मुलाखतीचे आयोजन होऊ शकत नसल्याने विद्यापीठाच्या सेंट्रल ट्रेनिंग ण्ड प्लेसमेंट कक्षाच्या विनंतीवरुन नोसिल लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी, सहायक व्यवस्थापक श्रीराम कुलकर्णी आणि मनुष्यबळ व्यवस्थापक सुमित हैबत यांनी ऑनलाईन मुलाखतींचे आयोजन केले होते. या मुलाखतींमधून केमिकल टेक्नॉलॉजीचे कुणाल भुत्ते, राजू मालेकर, भावेश…

Read More

जळगाव : प्रतिनिधी प्रत्येक व्यक्तीने उत्साह व जिद्द ठेवली तर तो आयुष्यात कुठल्याही अडचणींचा सामना सहज करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते, असे प्रतिपादन कमांडिंग ऑफिसर प्रवीण धीमन यांनी केले. जिल्ह्यातील ७ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल त्यांच्या पालकांचा सत्कार बुधवारी नूतन मराठा महाविद्यालयात करण्यात आला. या वेळी चाळीसगावचे शहीद जवान यश देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख हे होते. प्रमुख पाहुणे लेफ्टनंट राहुल पाटील हे उपस्थित होते. प्रास्ताविकात एनसीसी प्रमुख लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी महाविद्यालयातील एनएसएस युनिट आणि कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. लेफ्टनंट राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सैन्य भरती संबंधित परीक्षावर…

Read More

विवो इंडिया लवकरच भारतात आपला आणखी एक स्मार्टफोन Vivo Y51 (2020) लाँच करू शकते. हा स्मार्टफोन Vivo S1 Pro चा रिप्लेसमेंट आहे. विवोने आज भारतात ५जी सेगमेंटचा जबरदस्त फोन Vivo V20 Pro 5G लाँच केला आहे. याची खूप दिवसांपासून उत्सूकता होती. Vivo Y51 मध्ये कंपनी भारतात Qualcomm Snapdragon 665 SoC प्रोसेसर सोबत लाँच करू शकते. तसेच या फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. या फोनची भारतात रियलमी, ओप्पो, एमआय आणि सॅमसंगसह अन्य कंपन्याच्या मिड रेंज मोबाइल सोबत टक्कर पाहायला मिळेल. Vivo Y51 चे खास वैशिष्ट्ये Vivo Y51 फोनमध्ये ६.३८ इंचाचा full-HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. याचा रिझॉल्यूशन 1080×2340 पिक्सल…

Read More

जगात आपल्या मसाल्यांची छाप सोडणारे एमडीएच (MDH) मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी (Mahashay Dharampal Gulati) यांचं निधन झालं. आज पहाटे ५.३८ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे वय ९८ वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केवळ पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांनी बड्या उद्योगपतींना मागे टाकत २०१७ मध्ये देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला होता. ‘एमडीएच’ची वार्षिक उलाढाल १५०० कोटींच्याही वर आहे. त्यांच्या कंपनीकडे १५ कारखाने असून १००० डिलर्सचं जाळं आहे. महाशय…

Read More

नागपूर : जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे भारताच्या परंपरेत आहेत. विश्वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावशाली आहेत. विविधतांना जोडणारा घटक हा फक्त भारताजवळच असून तो आम्हास जगाला द्यायचा आहे. जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सक्षम असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि रशियाची दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं सुरू केलं. यामध्ये अमेरिका जिंकली, महासत्ता झाली; पण जगाला एकत्र ठेवू शकली नाही, असे मोहन भागवत म्हणाले. ‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारताची भूमिका’ या विषयावर दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. दरम्यान,…

Read More

केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण हा सन्मान परत केला आहे. नवी दिल्ली: केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण हा सन्मान परत केला आहे. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीनपानी पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण परत केला आपला पद्मविभूषण सन्मान परत करताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल म्हणाले,…

Read More