जळगाव : प्रतिनिधी नवीन शिक्षण नीती धोरणात योग विषयाचा समावेश, शालांत तसेच उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रमुख विषयामध्ये योगास स्थान देणे, महाविद्यालयात योग विषय अनिवार्य करणे, मनपा तसेच जिल्हा परिषद शाळेत योग विषयाचा समावेश, युजीसी मान्यताप्राप्त अस्थापना मधून प्रशिक्षित योग शिक्षकांना प्राधान्य देणे आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी आणि महापौर भारतीताई सोनवणे यांना देण्यात आले. अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या जळगाव शाखेचा नुकताच शुभारंभ झाला. त्यानंतर महासंघाच्या वतीने योग शास्त्राच्या प्रचाराची मोहीम सुरू केलेली आहे. गुरूमुखातून प्रकट ज्ञानाला पुन्हा शिक्षणाचा दर्जा देण्यासाठी योग महासंघाच्यावतीने जळगाव जिल्ह्यातील प्रमुख धोरणकर्त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी शेतकरी हा संपूर्ण देशवासीयांचा पोशिंदा व अन्नदाता आहे. कृषी क्षेत्र हा आपला पाठीचा कणा आहे.असे असतांनासुद्धा केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तीन नवे कृषी कायदे संमत केले आहे. हे कायदे मुळातच देशभरातील शेतकर्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता हे विधेयके मंजूर केली आहे. या कायद्यांमुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर गुजराण करणार्या शेतकर्यांना हद्दपार करतील. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मोडतोड करून भांडवलदारांच्या ताब्यात देण्याची कृती सुरू आहे. कोरडवाहू आणि आर्थिक दृष्ट्या दुबळ्या असलेल्या शेतकर्यांना शेतमालाच्या हमीभावाचे जे कवच आहे ते गळून पडेल. म्हणून यासंदर्भातील तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी…
डॉ. शीतल आमटे मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत एक महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांनी कुत्र्यांसाठी मागवलेले इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपुरातील फार्मासिस्टच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. नागपूर: महारोगी सेवा समितीच्या सीईओ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शीतल आमटे यांनी कुत्र्यांसाठी मागवलेले इंजेक्शन वापरून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या दिशेने आता पोलीस तपास करण्यात येत आहे. समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्या नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी ३० नोव्हेंबरला विषारी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली होती. आनंदवनात ही…
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला (BJP) मोठा फटका बसला आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड (Arun Lad) यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे. नागपूर (Nagpur) पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस (Congress) व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी (Abhijit Wanjarri) विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद…
आजपासून टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कॅनबेरा येथे खेळला जाणार आहे, परंतु पॅट कमिन्स (Pat Cummins) या स्पर्धेत भाग घेणार नाहीत. ब्रेट लीचे (Brett Lee) असे मत आहे की जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर तो आरामशीर होऊ शकतो परंतु तंदुरुस्त खेळाडूंनी जास्तीत जास्त सामने खेळायला हवे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने टीम इंडियाविरूद्ध वन डे मालिकेच्या अवघ्या २ सामन्यांनंतर पॅट कमिन्सला विश्रांती देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कमिन्स ऑगस्टमध्ये इंग्लंड दौर्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य होता आणि IPL २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) साठी देखील खेळला होता. अखेरच्या वनडे सामन्यासाठी त्याला विश्रांती…
नाशिक : धुळे-नंदूरबार विधानपरिषद निवडणुकीत अमरीश पटेल (Amrish Patel) यांचा विजय झाला आहे. ४३४ मतांपैकी ३३२ मतं अमरीश पटेल यांना तर काँग्रेसच्या अभिजित पाटील यांना ९८ मतं मिळाली आहेत. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अमरीश पटेल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजित पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. दरम्यान,अमरीश पटेल विरोधकांची ११५ मतं फोडण्यात यशस्वी झाले. यावरून महाविकास आघाडीत काहीही ठीकठाक नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आता यावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी आघाडीच्या नेत्यांवर मोठा आरोप केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरीश पटेल यांचे गुलाम आहेत, असा घणाघाती आरोप गोटे यांनी केला आहे. आता त्यांच्या या आरोपावर…
मुंबई : मुद्दा कुठलाही असो, शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत (sanjay raut) हे नेहमी भाजपाच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वावर टीका करतात. यावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊत यांना टोमणा मारला, आले अंगावर की ढकल भाजपावर, ही संजय राऊतांची भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बहुतांश योजनांच्या विरोधात राऊत बोलतात. कोरोना काळात राज्यातील सर्व वर्गांतील नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली असताना राज्य मदत देण्यास असमर्थ असल्याचे सांगत त्यांनी अनेकदा केंद्राकडे बोट दाखवले. त्यांच्या या भूमिकेवर भाजपाने टीका केली. “या सरकारला स्वतःचं कोणतंही धोरण नाही. कामे करण्याची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमधील तीनही पक्षांत समन्वय नाही. एक मंत्री एक भूमिका…
मुंबई : गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच पुढील सहा महिने पुरेल इतका 125 ते 130 लाख मे. टन साखर साठा आहे. नवीन उत्पादीत केलेली साखर विक्रीसाठी मार्च २०२१ उजाडणार आहे. तेथून पुढे तयार होणारी साखर पुढील सोळा महिने विकावी लागणार आहे. पुढील २०२२चा हंगामही बंपर उत्पादन देणारा असेल, असा अंदाज आहे. त्यामुळेच साखर विक्रीचे मोठे आव्हान कारखान्यांपुढे आहे. कोरोनामुळे देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची मागणी कमी झाली. निर्यात रखडल्याने शिल्लक राहिलेली १० लाख मेट्रीक टन साखर शिल्लक राहिली. शिल्लक आणि नव्याने उत्पादन अशी एकूण १२५ लाख मेट्रीक टन साखर विक्रीचे आव्हान देशातील साखर कारखान्यांपुढे आहे. दरमहा २० लाख मे. टन साखरेची विक्री होते. या हिशोबाने…
आरबीआयने (RBI)एचडीएफसीला (HDFC Bank)आपल्या ग्राहकांना नवीन क्रिडिट कार्ड (Credit Card)देण्यास मनाई केली आहे. हा एचडीएफसी या खासगी बँकेला मोठा धक्का मानला जात आहे. आरबीआयने एचडीएफसीच्या डिजीटल २.० या अंतर्गत सुरु केलेल्या सर्व डिजीटल अॅक्टिव्हिटी थांबवण्यास सांगितल्या आहेत. यात ग्राहकांना नवीन क्रेडिट कार्ड देण्याचाही समावेश आहे. आरबीआयने हे आदेश २ डिसेंबरला एचडीएफसी बँकेला दिले. आरबीआयने हा निर्णय एचडीएफसी बँकेच्या गेल्या २ वर्षात इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगमध्ये सातत्याने आलेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. यात २१ नोव्हेंबरला एचडीएफसीच्या प्रमुख डाटा सेंटरमधील पॉवर फेल्युअरचाही सामावेश आहे. यामुळे बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये व्यत्यय आला होता. आरबीआयने आपल्या आदेशात बँकेच्या संचालक मंडळाला आपल्या…
मुंबई : डिझेल परताव्यासाठी सन २०२० – २१ या वर्षासाठी करण्यात आलेल्या तरतुदीपैकी उर्वरित ४०.६५ कोटी रुपयाची रक्कम लवकरात लवकर मत्स्य व्यवसाय विभागास देण्याची मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. अर्थमंत्र्यांनी डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विभागास वितरित करण्याचे निर्देश संबंधित सचिवांना दिले, असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. शेख यांनी दिली. सन २०२० व २०२१ या आर्थिक वर्षामध्ये डिझेल परताव्यासाठी रु. ६० कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यातील फक्त १९.३५ कोटी रुपये रक्कमच मत्स्यव्यवसाय विभागाला वितरित करण्यात आली. उर्वरित ४०.६५ कोटी रुपये लवकरात लवकर मत्स्य व्यवसाय विभागास…