जळगाव, प्रतिनिधी । दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी(१ ऑक्टोबर) महावितरणने निकाल जाहीर केला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातील ४५३४ उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे डॉ. राऊत यांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे. “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडी सरकारतर्फे बेरोजगार युवकांना विद्युत सहाय्यक नोकरीची ही भेट देण्यात आली आहे. विविध न्यायालयीन प्रक्रियेत हा निकाल प्रदीर्घ काळ अडकला होता. या विषयावर विविध बैठका घेऊन व कायदेतज्ञांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा सूचना मी…
Author: saimat team
यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेने बांधकाम केलेल्या अतिरिक्त साठवण तलावाच्या बांधकामात गैरप्रकार,भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अध्यक्षा सौ.नौशाद तडवी यांनी व त्यांच्या काही मोजक्या सहकारी नगरसेवकांनी केली असली तरी न्यायालया मार्फत चौकशी झाल्यास फिर्यादी हेच आरोपी होऊ शकतात तसेच यावल नगरपरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती म्हणून आरक्षण असल्याने तसेच अनुसूचित जमातीच्या अध्यक्षा सुरेखा कोळी या अपात्र ठरल्याच्या कारणावरुन अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर नगरपरिषद सदस्यांमध्ये एकमेव असलेल्या अनुसूचित जमातीच्या सदस्या सौ.नौशाद मुबारक तडवी यांच्या निवडीसाठी मी स्वतः तसेच नगरसेवक राकेश कोलते अनुक्रमे सूचक,अनुमोदक झालेले आहेत त्यामुळे त्यांच्याबाबत कधी गैरसमज, मतभेद नव्हते आणि नाहीत.तरी सुद्धा त्यांनी अतिरिक्त साठवण तलाव बांधकामाबाबत खोटी तक्रार करून तसेच…
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा जळगाव शहरातून जातो. तर शहराच्या बाहेर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच महाविद्यालय व काही प्रायव्हेट कंपन्या आहेत. याठिकाणी नियमित विद्यार्थी, शिक्षक व कामगार ये-जा करीत असतात. तर बांभोरी गावापासून ते थेट पाळधी बायपास पर्यंत मुख्य महामार्गाच्या अगदीकडेला काही दुकानदारांनी दुकाने थाटल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे उदाहरण आज सायंकाळी 5 वा. समोर आले आहे. शहरातून धुळेकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वरबांभोरी गावापासून ते पाळधी बायपासपर्यंत भरपूर हॉटेल्स्ची अवैध पार्किंग तसेच रस्त्याच्या कडेला काही दुकानदारांनी खेळण्याचे साहित्य तसेच विविध वस्तू विक्रीचे दुकाने थाटले आहेत. त्यामुळे जाणारे येणारे या दुकानातून वस्तू घेण्यासाठी गाडी थांवितात परंतु त्या…
जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्यावतीने 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबरपर्यंत सेवा समर्पण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून उद्या दि 2 ऑक्टोंबर शनिवार रोजी महात्मा गांधी,व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा महानगरतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात येईल, फुले मार्केट परीसर येथे स्वछता अभियानाची सुरवात ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, स्थायी सभापती राजेंद्र घुगे – पाटील, गटनेते भगत बालाणी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात येईल तसेच खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे मंडल क्र…
जळगाव, प्रतिनिधी । नारी शक्ती ग्रुप जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांसाठी नेत्र तपासणी शिबिर मांगीलालजी बाफना नेत्रपेढी जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यात आदित्य ढवळे पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्था बेघर निवारा केंद्र येथील एकूण 32 जणांची नेत्रतपासणी केशव स्मृती प्रतिष्ठान व आर सी बाफना फाऊंडेशन संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय या ठिकाणी डॉ.नयना उभाड पाटील एम. एस.ऑप्थो. यांनी केली व नेत्र तपासणीतून चष्मे तयार करण्यात आले असून चष्मे वाटप महापौर जयश्री महाजन, उपायुक्त शाम गोसावी व इतर मान्यवरांच्य्या हस्ते करण्यात येणार आहे. बऱ्याचदा आपण बघतो की वाढदिवस हे पुष्पगुच्छ देऊन केक कापून अथवा अन्नदान करून साजरे केले…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्याकरीता झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसाच्या आत पूर्ण करुन अहवाल शासनास सादर करा. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिलेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता रुपा गोजरे, लघु पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.…
एरंडोल, प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या एरंडोल शाखेमार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असून शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील एकूण दहा आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात महिला व बालविकास विभागांतर्गत सुरू असलेले कै.यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित अनाथ निराधार निराश्रित मुलांचे बालगृह खडके बु. ता.एरंडोल येथील अधीक्षक मधुकर कपाटे यांना अनाथ मुलांचे पालन पोषण संगोपन व पुनर्वसनासाठी आणि मुलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन विविध उपक्रम राबवून बालकांना देशाचे भावी नागरीक घडविण्याचे कार्य करुन राष्ट्र निर्माण करण्यासाठी अतुलनीय योगदान देत असल्यामुळे सागर महाजन जिल्हा समन्वयक मिलिंद सूर्यवंशी, एरंडोल तालुका अध्यक्ष राकेश राजपूत,…
जळगाव, प्रतिनिधी । अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दी जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीत असोसिएशनच्या सभागृहात अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना/नोंदणीबाबत विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरात अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने 1 ऑक्टोबरपासून विक्री बिलांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत परवाना क्रमांक नमूद करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच अन्न धान्य घाउक विक्री, आडतदार, अन्न धान्य वितरक आणि अन्न पदार्थ साठवणुकीसाठी वापरले जाणारे गोदाम याकरीता परवाना/ नोंदणी बंधनकारक असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी अन्न व्यावसायिकांच्या शंकांचे निराकरण करुन शिबिराच्या…
जळगाव, प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या एकपात्री नाट्यछटा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पाडण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्षल पाटील केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर केसीई सोसायटीचे शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , संदीप केदार , मुख्या. रेखा पाटील तसेच डी व्ही चौधरी यांच्या हस्ते गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नाटकाने आपल्या जीवनाचे खरे चित्र समोर येते. कालबाह्य झालेल्या गोष्टी शिकणे आणि त्यामध्ये प्रावीण्य संपादन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे. ज्या प्रमाणे नाटकात आपल्या चेहऱ्यावर ती आपल्या जीवनाचे वेगवेगळे हावभाव दिसतात त्याचप्रमाणे आपला चेहरा सदा बोलका…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील नूतन वर्षा कॉलनी येथे भारत विकास परिषदेच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील महाबळ परिसर येथील नूतन वर्षा कॉलनी भागात भारत विकास परिषदेच्यावतीने आज 1 ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत महिलांसाठी लहान मुलांसाठी हिमोग्लोबीन व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. प्रभू व्यास, डॉ. राहुल व्यास, डॉ. योगेश पाटील, डॉ. दिक्षा सिकवाल, भारत विकास परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष उज्वल चौधरी, महिला संयोजिका सीमा महाजन, सचिव उमेश पाटील, सभासद प्रशांत महाजन, राधिका नारखेडे, जानवी खाडिलकर, हेमांगीनी महाजन, शैलेजा कोचर, नाना कोळी आदींची उपस्थिती होती.