यावल, प्रतिनिधी । राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013अंतर्गत रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने विविध अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत परंतु यावल रावेर तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागात आणि जिल्ह्यात रेशन कार्ड धारकाचे हक्क आणि अधिकार कोणी आणि कशासाठी कोणत्या हेतूने खड्ड्यात टाकले याकडे तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रेशनकार्डधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे रेशन कार्डधारकांना मध्ये पुरवठा विभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रेशन धान्य दुकान धान्य वाटप/वितरण करण्यासाठी सकाळी चार तास आणि दुपारी चार तास धान्य दुकान सुरू पाहिजे आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते. प्रत्येक रेशन दुकानांमध्ये दर्शनी भागात रेशन कार्ड धारक यांना…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । आनंद, समाधान आणि नवनिर्मितीतून सृजनशील समाज उभारण्यासाठी कला महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कलेच्या माध्यमातून प्रतिबिंब असते, यातूनच वैचारिक समृद्धी घडते. ‘भाऊंना भावांजली’ परिवर्तन महोत्सवातील लाॕकडाऊन डायरी चित्रप्रदर्शनातील ‘कला आणि माणूस’ या संदर्भात चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी देशदूतचे संपादक हेमंत अलोने, चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, हरुन पटेल, ज्ञानेश्वर शेंडे, कलाशिक्षक नितीन सोनवणे यांनी सहभाग घेतला. कला आणि संस्कृती यांची माणसाच्या जडणघडणीत असलेले महत्त्व याविषयी चर्चा करताना हरुन पटेल यांनी जगण्याचे सौंदर्य निर्माण करते ती कला असे स्पष्ट केले. कलावंत हा नेहमी नवे भावविश्व निर्माण करीत असतो, यातूनही बौद्धिक समृद्धी घडते. माणसाच्या इतिहासाचा आढावा घेतला असता तर मूळ…
जामनेर, प्रतिनिधी । येथील लाकडाने भरलेल्या ट्रकने प्रवासी वाहून येणाऱ्या रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले असून यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जामनेर ते गारखेड्याच्या दरम्यान लाकडाने भरलेल्या ट्रकने प्रवासी वाहून नेणाऱ्या पॅजो रिक्षाला समोरून धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौघांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी हा अपघात घडला. लाकडाने भरलेला ट्रक जामनेरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जात होता. तर समोरून प्रवाशांनी भरलेली रिक्षा येत होती. गारखेडा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिली. यात दोन जण…
चोपडा, प्रतिनिधी । येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कर्नाटकातील बंगळूर येथे घडलेल्या विकृत घटनेचा अ.भा.मराठा महासंघ चोपडा तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. याबद्दल सविस्तर वृत्त असे की,कर्नाटकातील बंगळूर येथे काही समाजकंटकांनी अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर शाई फेक करुन जाणिव पूर्वक विटंबना केली.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत अशा महापुरुषांचा अपमान त्या ठिकाणी केला गेला.त्यामुळे बंगळूर येथील घटनेमुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या.या विकृत घटनेच्या निषेधार्थ चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या स्मारकावर दुग्धाभिषेक करुन माल्यार्पण करण्यात आले.तसेच कन्नड समितीच्या जाहिर निषेधार्थ घोषणांनी परिसर दणाणून गेला.त्यानंतर चोपडा तहसील व शहर पोलिस…
जळगाव :- प्रतिनिधी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खडसे यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनीही निवडणुकीसाठी युद्धपातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बोदवड येथे झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला. कोण कुठे होते माझ्यापुढे शेपटी हलवणारे मागेपुढे फिरणारे आणि तेच आता मला विचारतात तीस वर्षात तुम्ही काय केलं? टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं, पक्षाचा आशीर्वाद असला तरी माझ्या शब्दाला मान होता, असे म्हणत खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना खडेबोल सुनावले…
मुंबई : देशातील महत्वाच्या सार्वजनिक कंपन्या आपल्या मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालणारा देशातील सर्वात मोठा ‘डिलर’ व ‘ब्रोकर’चे काम करणाऱ्या भारतीय जनात पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर आरोप करणे हेच हास्यास्पद आहे. राफेलमधील दलाली, नोटबंदीमध्ये जुन्या नोटा बदलून देण्याच्या मोबदल्यात कोणत्या पक्षाच्या लोकांनी करोडो रुपयांची दलाली खाल्ली हे देशाच्या जनतेला माहित आहे, असे खरमरीत उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे. अमित शहा आणि भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले, ‘डीबीटी’ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना १ जानेवारी २०१३ रोजी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने सुरु केली त्याचे श्रेयही अमित शहा भाजपाला…
रावेर ः तालुका प्रतिनिधी मध्यप्रदेशातून कोट्यवधी रुपयांची ब्राऊन शुगर घेऊन जळगाव जिल्ह्यात टॅक्सीने आलेल्या बऱ्हाणपूर येथील महिलेस जळगाव पोलिसांनी रावेर येथे ताब्यात घेऊन तिच्याकडून 500 ग्रॅम ब्राऊन शुगरची दोन पाकीटे हस्तगत केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने केली मात्र रावेर पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्याचा भस्मासुर बोकाळला असून अवैध धंद्यावाल्यांनी चहा व पानटपरी सारखी आपली दुकाने थाटली आहेत. रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे कायदेप्रिय आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या गुड बुक मधील ते अधिकारी असून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे मात्र अवैध धंद्यावाल्यांना पाठीशी घालून अवैध धंद्यांना चालना देण्याचे कामही त्यांच्या मार्फत होत असल्याने त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले…
चोपडा ः प्रतिनिधी येथील नगरपरिषदेच्या नूतन पाणीपुरवठा योजनेंतर्गत रु. 64.76 कोटीच्या जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभाचे उद्घाटनआज 11 वाजता उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील हे होते. याप्रसंगी विशेष उपस्थितीमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,डॉ.सतिष पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांचा सहभाग होता. यावेळी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदिप पाटील, , माजी आमदार कैलास पाटील, माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे, माजी शिक्षक आमदार…
जळगाव ः प्रतिनिधी येथील मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांचा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. संबंधीत प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक माळूंदे हे वास्तव्यास नाशिकला असतात, त्याचा गैरफायदा घेत स्थानिक उपविभागीय अभियंता हे त्यांचा मनमानी कारभार चालवित असल्याच्या तक्रारी जोर धरीत आहेत. याबाबत काही ठेकेदार अधिक्षक अभियंता व मुख्यअभियंता यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जळगाव येथील मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यालयातील अजब गजब किस्से यापूर्वीही सायंदैनिक साईमतने सडेतोड प्रकाशित केले आहेत. यात नव्याने भर पाडीत स्थानिक उपविभागीय अभियंते यांच्या मनमानी कारभारामुळे ठेकेदार त्रस्त असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक…