जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ‘‘ओमिक्रॉन’’ ही नवीन विषाणु प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा अधिक धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये /रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने दिनांक 31 डिसेंबर, 2021 पासून पुढील आदेश होईपर्यंत खालील निर्बध लागू करण्यात आले आहे. लग्न समारंभ : बंदिस्त जागेमध्ये किंवा मोकळया जागेत साजरा होणारे लग्न समारंभ हे केवळ 50 लोकांच्या मर्यादेत साजरा करता येतील कार्यक्रम / मेळावे:- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठया प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम हे केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत बंदिस्त जागेमध्ये किंवा मोकळया जागेत साजरा करता…
Author: saimat team
चोपडा, प्रतिनिधी । मागील दोन वर्षांपासून कोरोना सारख्या संकटाच्या काळामुळे ऑनलाइन शाळा, क्लासेस आणि मोबाईल याला कंटाळलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रा. स्व. संघाने एक जानेवारी पासुन (शनिवार आणि रविवार ) दोन दिवसीय हिवाळी शिबीर शहरातील बालमोहन विद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व मैदानी खेळ, देशभक्तीपर गीते , राष्ट्रीय विषयांची मांडणी ,शालेय विद्यार्थी आणि सोशल मीडिया इत्यादी अनेक गोष्टी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा आणि कोरोना सारख्या संकटाला मात देण्यासाठी त्यांची मानसिक स्थिती बळकट व्हावी यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शहर आणि तालुक्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. अशी चोपडा…
मुक्ताईनगर, प्रतिनिधी । शहरात अवैध धंदे चालकांविरुद्ध नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह गृहमंत्र्यांकडे केल्यानंतर मुक्ताईनगर अलिकडेच सत्ता संघर्ष पेटला होता. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी पदाधिकार्यांमध्ये आरोपांच्या फैरीदेखील झडल्या होत्या मात्र हे सर्व सुरूच असतानाच दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगरातील अवैध धंदे चालकांविरोधात नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे पथकाने कारवाई केल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीवरून कारवाई शहरात सट्टा, पत्ता, चक्रीचा सट्टा, ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची तक्रारी होत्या. त्यातच…
मुक्ताईनगर, प्रतिनिधी । मुक्ताईनगर से आमदार चंद्रकांत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत ची माहिती आपल्या सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट केली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपून परतल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार आमदार चंद्रकांत पाटील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून अधिकृत माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. हिवाळी अधिवेशन आटोपून परतत असताना त्यांना रस्त्यातच खोकला, सर्दीचा आणि तापाचा त्रास जाणवू लागला. शुक्रवारी त्यांनी तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील इंद्रप्रस्थ नगरात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. थर्टी फर्स्टनिमित्त केक घेण्यासाठी आई बाहेर गेली असता घरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरात राहणाऱ्या राधिका भागवत भोसले ( वय – १५) असे मयत मुलीचे नाव आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी राधिका ही आई व बहिणींसह जळगावातील इंद्रप्रस्थ नगरात भाड्याने घरात राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील द्रोपदी नगरातील एका वकिलाची १३ हजार रुपये किमतीची सायकल चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी तपास चक्र फिरवून आरोपीला अटक करून त्याच्याकडील सायकल मिळवून फिर्यादीस आज परत दिली. फिर्यादी ऍड योगेश शरद महाजन रा द्रौपदी नगर जळगाव यांचे मार्च 2021 मुद्दे राहते घरून हरकुलस कंपनीची 13000/-रुपयांची सायकल चोरीस गेली होती त्याबाबत जिल्हापेठ पोस्टेत येथे फिर्याद दिलेने कलम-379 IPC चा गुन्हा दाखल होता. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना प्रदीप पाटील यांचे कडे तपास दिला असता गोपनीय खात्रीशीर बातमीदारा कडून मिळालेले बातमीवरून नमूद सायकल आरोपी नामे ईस्त्यायीक अली राजीव अली रा. तांबापुरा जळगाव याचे…
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद येथील ३१ वर्षीय युवकाची आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल तालुक्यातील भालोद येथील ३१ वर्षीय तरूणाने दुर्धर आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र प्रभाकर जावळे (वय ३१, रा. भालोद ता. यावल) असे तरूणाचे नाव आहे. रविंद्र जावळे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौचास जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत त्याचा…
पहुर, प्रतिनिधी । तालुक्यातील शेंदुर्णी येथे गाडी लावण्याच्या कारणावरून एकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरसेवकासह पाच जणांविरुद्ध पहूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे वाडी दरवाजा जवळ गाडी लावण्याच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला झाला, समाधान पाटील यांनी जवळचे शेंदुर्णी कुरुक्षेत्र कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता तेथून परत येत असताना हनुमान मंदिराजवळ रात्री दहा वाजेच्या सुमारास सागर सुभाष ढगे, गोविंदा अर्जुन बारी, विकी सुभाष ढगे, शरद बाबुराव आस्वार, शिवम गजानन गुजर, सर्व राहणार वाडी दरवाजा, यांनी लोखंडी रॉड, दांड्यासह इतर साहित्याने प्राणघातक हल्ला अडवित भारत गंभीर जखमी करून उजव्या पायावर मार बसून पायाचे…
जळगाव, प्रतिनिधी । रायसोनी इस्टीट्यूट येथील प्रा. सोनल पाटील यांना नुकतीच सरदार वल्लभभाई नॅशनल इस्टीट्यूट टेक्नोलॉजी सुरत येथून कॉम्युटर सायन्स अॅन्ड इंजीनियरिग या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. त्या जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिसिनेस मॅनेजमेंट येथे संगणकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांनी “फोटो व व्हिडिओमधील फेरफार शोधून काढणे” या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला. मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. कृपा जरीवाला यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्या डॉ. पी. के. पाटील व सौ. सुरेखा पाटील यांच्या…