सिडनी : वृत्तसंस्था
आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या सुमारे दोन महिने आधी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्की स्पर्धेसाठी १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.या १८ खेळाडूंमधून १५ खेळाडूंची निवड केली जाईल आणि उर्वरित खेळाडूंना राखीव ठेवण्यात येईल.
विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात लाबुशेनचे नाव नाही म्हणजेच विश्वचषक योजनेतून आणि संघातून त्याला वगळण्यात आले आहे. कमिन्स व वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडनेही पुनरागमन केले आहे.ऑस्ट्रेलियाला विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि नंतर भारताविरुद्ध वन डे मालिका खेळायची आहे.त्याचबरोबर या संघात तनवीर सांघा आणि ॲरॉन हार्डी हे सरप्राईज पॅकेज आहेत.३४ वर्षीय ग्लेन मॅक्सवेल दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळणार नाही कारण तो लवकरच पिता होणार आहे.यानंतर तो भारतीय दौऱ्यातून संघात सामील होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका २२ ते २७ सप्टेंबर दरम्यान मोहाली, इंदोर आणि राजकोट येथे खेळवली जाणार आहे.
विश्वचषकासाठी जाहीर
झालेला ऑस्ट्रेलियन संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲश्टन अगर, ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर सांघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.