चोपडा : प्रतिनिधी
गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करणे आणि दुचाकी सोडविण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच घेतांना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. बुधवारी २३ ऑगस्ट रोजी तक्रारदाराचा भाऊ आणि त्याचा मित्र असे दोघे दुचाकीवरून रात्री ९वाजता चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासूर गावाजवळून जात असतांना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शिवाजी ढगू बाविस्कर (वय ५२) यांनी अडविले. तुमच्याजवळ गांजा आहे. गांजाची केस आणि दुचाकी सोडवायची असेल तर प्रत्येक ७५ हजार असे एकुण दीड लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंत पहाटे ४ वाजता तक्रारदारच्या नातेवाईकांकडून सुरूवातीला ३० हजार रूपये घेतले. त्यानंतर दुचाकी ठेवून घेतली. दुचाकी सोडवायची असल्यास पुन्हा २० हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी सहाय्यक फौजदार बाविस्कर यांनी केली. तडजोडी अंती १५ हजार रूपये देण्याचे ठरविले. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी चोपड़ा शहरात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून १५ हजार रूपये घेतांना सहाय्यक फौजदाराला अटक केली. ही कारवाई लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन,.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, स.फौ. सुरेश पाटील, पो.ह. रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. पो.कॉ. सचिन चाटे यांनी केली.