मुलतान : वृत्तसंस्था
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानसमोर नेपाळचे आव्हान होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने ५० षटकांत ६ बाद ३४२ धावा केल्या. त्याच्याकडून बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ १०४ धावांवर गारद झाला.
पाकिस्तानने आशिया कप २०२३ची सुरुवात विजयाने केली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्यांनी नेपाळचा २३८ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ६ गडी गमावून ३४२ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ २३.४ षटकांत १०४ धावांवर गारद झाला. पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरुद्ध २ सप्टेंबरला खेळायचा आहे. त्याचबरोबर नेपाळचा पुढील सामना भारताविरुद्ध ४ सप्टेंबरला आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. फखर जमानने १४ आणि इमाम-उल-हकने ५ धावा केल्या. यानंतर बाबर आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. रिझवान ५० चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ४४ धावा करून धावबाद झाला. आघा सलमान ५ धावा करून संदीप लामिछानेचा बळी ठरला. यानंतर मुलतानमध्ये बाबर आणि इफ्तिखारचे वादळ पाहायला मिळाले.