अजित पवारच भाजपकडे गेल्याने पवारांकडे राहिले ते काय?

0
10

सोलापूर : वृत्तसंस्था

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असले तरी त्यांच्या पक्षातील अजित पवारच सगळा पक्ष घेत आता भाजपकडे गेल्यानंतर पवारांकडे राहिले ते काय, असा सवाल करत हा पक्ष आता भाजपवासी झाला असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, अजित पवार भाजपकडे गेले तरी त्यांच्यावरील आरोपांपासून ते पळ काढू शकत नाहीत. यातून त्यांची सुटका होऊ शकणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

अक्कलकोट येथे जाहीर सभेसाठी आंबेडकर आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी भाजपसह राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. आंबेडकर म्हणाले की , शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. मात्र आज त्यांच्याकडे पक्ष म्हणून काहीही शिल्लक नाही.अजित पवार पक्ष म्हणून सर्वकाही त्यांच्यासोबत घेत भाजपाकडे गेले आहेत. या पक्षांतरामागेही जनतेला संशय असल्याने आज पवारांचे पक्षातील आणि जनतेतील वजन कमी झाले आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने जरी भाजपसोबत सलगी केली असली तरी या पक्षावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांना मुक्त होता येणार नाही. शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे आरोप केले आहेत, त्याचे ते खंडन करू शकणार नाहीत, असेही मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या अटकेची हिंमत राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार दाखवूच शकणार नाही.त्यासाठी आता भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची सूचनाही आंबेडकर यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच संभाजी भिडे यांच्या पाया पडतात. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे हे सगळेच लोक भिडेंच्या पाठिशी असल्याने त्यांच्यावर कारवाईची कोणीही हिंमत दाखवू शकणार नाही.या सगळ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची सूचना आंबेडकर यांनी केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here