प्रेमविवाहाचा राग, वृद्धेचा विनयभंग; एकावर गुन्हा
अमळनेर (प्रतिनिधी)-
तालुक्यातील शिरूड गावात ६० वर्षीय वृद्ध महिलेचा तिच्या मुलाने प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून एकाने विनयभंग केल्याची घटना २ मेरोजी सायंकाळी घडली. अमळनेर पोलिस ठाण्यात ३ मेरोजी दुपारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरूड गावात ६० वर्षीय वृध्द महिला मुलासोबत वास्तव्याला आहे. वृद्ध महिलेच्या मुलाने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून रवींद्र वैराळे याने वृद्ध महिलेला शिवीगाळ, मारहाण केली व अश्लील चाळे करत विनयभंग केला. त्याने महिलेच्या जेठाणीलादेखील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.