मुंबईत सैराट; प्रेमविवाह केल्यामुळे वडिलांनी मुलीसह जावयाला संपवले

0
43

मुंबई : प्रतिनिधी

गोवंडी परिसरात सैराटसारखीच घटना घडली. प्रेमविवाह केल्यामुळे वडिलांनी मुलीसह जावयाची निर्घृण हत्या केली. कुटुंबीयांच्याविरोधात जाऊन आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागात वडिलांनी मुलीसह जावयाला संपवले आहे. या घटनेमुळे खळबळ उडालीआहे.
या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक केली आहे.
वडिलांनी माहेरी आलेल्या गुलनाज खान या मुलीची दगडाने ठेचून हत्या केली तर जावई करण रमेश चंद्रची चाकूने वार करून हत्या केली. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील गोवंडी परिसरात घडला आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून १० पथके तयार करण्यात आली होती.यामध्ये पोलिसांनी वडील गोरा खान,भाऊ सलमान खानसह त्याचा २ अल्पवयीन मित्राला अटक करण्यात आली आहे.यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का? याविषयी पोलिसांकडून तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here