Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»भारत- पाकिस्तानमध्ये उद्या रोमांचक लढत
    क्रीडा

    भारत- पाकिस्तानमध्ये उद्या रोमांचक लढत

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 12, 2023Updated:October 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदाबाद : वृत्तसंस्था

    भारताने आयोजित केलेला एकदिवसीय विश्वचषक २०२३ रोमांचक सामन्यांसह पुढे जात आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना उद्या १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना डोळ्यासमोर ठेवून स्थानिक पोलिसांनी आधीच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
    या सामन्यासाठी संपूर्ण अहमदाबाद शहरात सर्व सुरक्षा यंत्रणांचे ११ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात असतील. त्यात दहशतवादविरोधी दल नॅशनल सिक्युरिटी गार्ड , रॅपिड ॲक्शन फोर्स , होमगार्ड आणि गुजरात पोलिसांचाही समावेश आहे.
    नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.या स्टेडियमची क्षमता सुमारे १.३० लाख प्रेक्षकांची आहे आणि सर्व तिकिटे विकली गेली आहेत. अशा स्थितीत हे स्टेडियम खचाखच भरले जाणार आहे. अहमदाबादचे पोलिस आयुक्त ज्ञानेंद्र सिंह मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान ७ हजारांहून अधिक पोलिस आणि सुमारे ४ हजार होमगार्ड कर्मचारी तैनात असतील.
    मलिक यांनी सांगितले की, एनएसजीची ३ टीम आणि अँटी ड्रोनची १ टीम देखील असेल. बॉम्बशोधक पथकासोबतच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्याही तैनात करण्यात येणार आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेतली होती.याशिवाय सुरक्षेसंदर्भातही बरीच तयारी करण्यात आली होती.
    अलीकडेच अहमदाबाद पोलिसांना भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाली होती. ५०० कोटी रुपयांव्यतिरिक्त, ज्या व्यक्तीने ईमेल पाठवला आहे त्याने तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेचीही मागणी केली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली आहे.एनएसजीसह इतर सुरक्षा यंत्रणांचीही मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय खेळाडूंच्याबाबतही सुरक्षा वाढवण्यात
    आली आहे.
    स्पर्धेतील भारत-पाकिस्तान संघ असा
    भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली,श्रेयस अय्यर,केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, शार्दुल ठाकूर.
    पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील , हरिस रौफ, मोहम्मद वसीम (ज्युनियर).

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.