Amrit Bharat Express : २ मे पासून मुंबई ते सहरसा अमृत भारत एक्स्प्रेस धावणार

0
7

२ मे पासून मुंबई ते सहरसा अमृत भारत एक्स्प्रेस धावणार

जळगाव (प्रतिनिधी ) –

जळगाव आणि भुसावळच्या मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते सहरसादरम्यान नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्स्प्रेस २ मेपासून सुरू होत आहे. या गाडीला जळगाव आणि भुसावळ येथे थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

११०१५ क्रमांकाची गाडी एलटीटी येथून दर शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी २ वाजता सहरसा येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ११०१६ क्रमांकाची गाडी सहरसा येथून दर रविवारी पहाटे ४.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपुर जंक्शन, मुजफ्फरपूर, समस्तीपुर, हसनपूर रोड आणि खगडिया जंक्शन येथे थांबे मंजूर आहेत. या गाडीला ८ शयनयान, ११ सामान्य द्वितीय श्रेणी डबे, १ पेंट्री कार आणि दोन सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे आहेत.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर उच्चस्तरीय सतर्कता बाळगण्यात आली आहे. जळगावत देखील खबरदारी घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here