Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»UPSC : आमोद्यातील किराणा दुकानदाराच्या मुलाचा ‘युपीएससी’ परीक्षेत झेंडा
    जळगाव

    UPSC : आमोद्यातील किराणा दुकानदाराच्या मुलाचा ‘युपीएससी’ परीक्षेत झेंडा

    Vikas PatilBy Vikas PatilApril 23, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आमोद्यातील किराणा दुकानदाराच्या
    मुलाचा ‘युपीएससी’ परीक्षेत झेंडा

    जळगाव (प्रतिनिधी) –

    केंद्रीय लोकसेवा आयोगाने अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. त्यात जिल्ह्यातील आमोदे (ता.यावल) येथील योगेश पाटील या तरूणाने ८११ क्रमांकाने यश संपादित केले आहे. त्यांचे वडील गावी किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

    केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे अनेकांचे स्वप्न असते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तरुण रात्रंदिवस अभ्यास करतात. मनोरंजनाच्या सर्व इच्छा बाजूला ठेवत केवळ अभ्यास एके अभ्यास यावर लक्ष केंद्रिंत करतात. तरीही अनेकांच्या पदरी अपयश येते.

    काही जण तर केवळ एक किंवा दोन टक्क्यांनी मागे राहतात. काही जण परीक्षेत एकदा अपयश आल्यावर पुन्हा जोमाने पुढील परीक्षेसाठी तयारी करतात. त्यासाठी केवळ अभ्यासावर भर न देता काही युवक आयएस झालेल्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून या परीक्षेच्या तयारीविषयी विशेष काय करता येणे शक्य आहे, ते जाणून घेतात.

    अशाच काही ध्येयवादी युवकांमधील एक नाव म्हणजे योगेश पाटील. जळगावच्या यावल तालुक्यातील आमोदे येथील योगेश युपीएससी उत्तीर्ण होण्याच्या इच्छेने झपाटला होता. त्यासाठी त्याने गाव सोडले. मुंबईचा रस्ता धरला. अंबरनाथ येथे आत्याकडे राहून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीचे शिक्षण ठाण्यात तसेच बी. टेकचे शिक्षण नागपूरमध्ये पूर्ण केले.
    घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच, त्याने आएएस अधिकारी होण्यासाठी तयारी सुरु केली होती. युपीएससी परीक्षेची तयारी करताना योगेशला कुटुंबियांची व नातेवाईकांची खंबीर साथ वेळोवेळी मिळाली. घरबसल्या युट्युबवरील उपयुक्त चित्रफित पाहुन तसेच पुस्तकांचे वाचन करून केवळ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवर त्याने लक्ष्य केंद्रीत केले होते.

    पहिल्या तीन प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, योगेशने आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून चिकाटीने अभ्यास सुरूच ठेवला. अखेर चौथ्या प्रयत्नात त्यास युपीएससीच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवता आला. योगेशचे वडील ललित पाटील यांचे किराणा दुकान आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.