अजित पवारांचे बीडमध्ये जंगी स्वागत

0
30

बीड ः वृत्तसंस्था

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असे गट पाहायला मिळत आहेत. दरम्यान शरद पवारांकडून अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये शरद पवार यांची नुकतीच सभा पार पडली.त्यानंतर आज (रविवारी) धनंजय मुंडे यांच्याकडून बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचे पहिल्यांदाच बीड शहरात आगमन झाले.त्यांंचे बीडकरांनी जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले आहे.चौकाचौकात त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.अजित पवारांसोबत असलेले अन्य आठमंत्री देखील या रॅलीत सहभागी झाले.बीडच्या रस्त्यावर पाय ठेवण्यासाठी देखील जागा दिसून येत नव्हती. स्वतः धनंजय मुंडे देखील अजित पवार ज्या ओपन जीपमध्ये उभे होते त्यांच्याशेजारी उभे दिसून आले.
बीडमधील सभास्थळी जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाला भेट दिली.त्यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांंनी आपल्या मोर्चा थेट बीड शहराकडे व सभास्थळाकडे वळवला.
सर्व मंत्रीही उपस्थित
स्वागतानंतर झालेल्या जाहीर सभेत अजित पवार गटातील अनेक महत्वाचे नेते आणि मंत्री सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) एकूण ९ मंत्री देखील यात सहभागी झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here