केस, नखांच्या गळतीनंतर आता थकवा, चिडखोरपणाचा त्रास
बुलढाणा (प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यात डिसेंबर पासून नागरिकांना अचानक केसगळतीचा त्रास सुरू झाला होता नंतर तीन महिन्यानंतर याच रुग्णांची नखं विदृप होऊन गळण्याचे प्रमाण वाढलं होतं. आता याच रुग्णांना थकवा व चिडखोरपणा जाणवत असल्यामुळे परिसरात चिंता वाढली आहे. केस गळती व नख गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांच्या नमुना सेलेनियमचे प्रमाण वाढलं होतं अशाच रुग्णांना आता चिडखोरपणा व थकवा येणे अशा तक्रारी समोर आल्याने परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे.
केस गळती समोर आल्यानंतर संशोधन संस्था आयसीएमआरच्या पथकाने दौरा करून नमुनेही तपासणीसाठी घेतले होते. चार महिने उलटूनही अद्याप या पथकाने अहवाल सादर केला नाही त्यानंतर नखं गळती सुरू झाली नखं गळतीनंतरही केंद्राच्या विशेष पथकाने या परिसराचा दौरा केला. काही दिवसातच या नागरिकांना आता थकवा व चिडखोरपणा जास्त जाणवू लागल्याने प्रशासनाने या नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची भावना दिसून येत आहे. बुलढाण्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या डिसेंबरपासून नागरिकांची फक्त तपासणी झाली. औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिले नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अद्यापही अहवाल जाहीर करण्यात आलेला नसल्याने सरकार नेमक काय लपवू पाहत आहे? यावर नागरिकांना शंका येत आहे. नक्की हा कुठला आजार आहे? या बद्दल नागरिक साशंक आहेत.