ॲड. केतन ढाके सरकारी वकील नियुक्त

0
24

जळगाव । प्रतिनिधी

मुक्ताईनगर येथील पोलिस ठाण्यात दाखल सी.आर.क्रं. ६३/२०२५ च्या केस प्रकरणी ॲड. केतन जयदेव ढाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्याच्या विधी व न्याय विभागाने केली असून त्यासंबंधीचे लेखी आदेश मंगळवारी (१८ मार्च) येथे प्राप्त झाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे यात्रोत्सवामध्ये मुलींची छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याप्रकरणी दाखल न्यायालयीन खटल्यास ॲड. केतन ढाके स्पेशल पब्लिक प्रॉसेक्युटर अर्थात सरकारी वकील म्हणून सरकार पक्षातर्फे काम पाहतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here