Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»आदित्य ठाकरेंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता
    मुंबई

    आदित्य ठाकरेंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी
    ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. कारण दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी करणार आहे. यासंदर्भातला आदेश आजच येण्याची चिन्हे आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे अशी माहिती समोर येते आहे.
    दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काही आमदार करत होते. त्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणात तुरुंगात जातील असे वक्तव्य केले होते. एका मराठी वृत्तवाहिनीने या विषयीचे वृत्त दिले आहे.
    विनायक राऊत काय म्हणाले?
    “सध्याचे शिंदे सरकार म्हणजेच मिंधे सरकार हे कपटी वृत्तीने काम करणारे सरकार आहे. मातोश्री, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची जी लोकप्रियता वाढली आहे त्याला लगाम घालण्यासाठी विनाकारण कुठल्या तरी प्रकरणी अडकवायचे हा प्रकार सुरु आहे. दिल्लीकरांना खुश करण्यासाठी शिंदे सरकार हे सगळे करत आहे मात्र त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.” असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
    दिशा सालियन प्रकरण काय आहे?
    मुंबईतली टंॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला. ८ जूनच्या रात्री मुंबईतल्या मालाड येथील गॅलेक्सी रिजेंट या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच ११ जून २०२० ला दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. दोन दिवस विलंब का झाला? हा प्रश्न उपस्थित होत होता. आता या प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होण्याची चिन्हे आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.