Adavad Forest Department takes : अडावद वनविभागाची अवैध बेलन वाहतुकीवर कारवाई

0
17

साग जातीच्या बेलन तस्करांवर कारवाई

साईमत/अडावद/ता.चोपडा/प्रतिनिधी

चोपडा तालुक्यातील विष्णापूर ते वर्डी रस्त्यावर वनपाल शीतल माळी यांनी विनापरवाना साग जातीच्या बेलन तस्करांवर कारवाई केली. या कारवाईत साग जातीचे मोठे बेलन ९५५ नग व लहान ८७७ नग आणि अंजन जातींचे ३०७ असे एकूण २१३९ अनघड बेलन नग जप्त करण्यात आले आहे. मात्र बेलन तस्करर फरार झाले.

दि.१४ रोजी सकाळी वनपाल विष्णापूर राऊंड शीतल माळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून काही इसम बेकायदेशीर विनापरवाना साग जातीचे बेलन याची वाहतूक करीत असल्याच्या माहितीवरून विष्णापूर ते वर्डी रस्त्यावर शितल माळी यांनी आपल्या राऊंड स्टाफसह सापडा रचला. काही जण संशयितरित्या हालचाल करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी त्या दिशेने गेले असता अवैध वाहतूक करणारे चोरटे साग व अंजन जातींचे अनघड बेलन सोडून पसार झाले.

या कारवाईत साग जातीचे मोठे बेलन ९५५ नग व लहान ८७७ नग आणि अंजन जातींचे ३०७ असे एकूण २१३९ अनघड बेलन नग (किंमत ३४ हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शीतल माळी वनपाल यांना विष्णापूर राउंडचा पदभार सांभाळायला फक्त दोनच महिने झाले असून त्यांच्याकडून दोन अवैद्य वाहतुकीच्या बेलन घटनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही कार्यवाही यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, चोपडा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेंद्र पाटील, अडावद वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कार्यवाही विष्णापूर वनपाल शितल माळी, वनरक्षक सुमित्रा पावरा, दर्शन सोनवणे, बाळासाहेब राठोड, वाहन चालक राजेश, वनमजूर कैलास सपकाळे, गोपाळ कोळी, सुरेश पावरा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here