Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अभिनेते, निर्माते मनोजकुमार यांचे निधन
    जळगाव

    अभिनेते, निर्माते मनोजकुमार यांचे निधन

    Vikas PatilBy Vikas PatilApril 4, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अभिनेते, निर्माते मनोजकुमार यांचे निधन

    मुंबई (प्रतिनिधी)-

    ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते मनोजकुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मनोज कुमार प्रदीर्घ काळ आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भरत कुमार’ म्हणून ओळखले जाते.

    अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या वायव्य प्रांतातील (सध्या खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) अबोटाबादमधील पंजाबी हिंदू ब्राम्हण कुटुंबात झाला. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. फाळणीनंतर मनोजकुमार १० वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब दिल्लीला स्थलांतरीत झाले.

    मनोजकुमार त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी विशेष ओळखले जात. त्यामुळे त्यांना ‘भारतकुमार’ हे टोपणनाव मिळाले. त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय चित्रपटसृष्टीत अमीट ठसा उमटवला.

    मनोजकुमार यांनी पटकथा लेखक, गीतकार आणि संपादक म्हणूनही कौशल्य सिद्ध केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले.

    मनोज कुमार व राजा खोसला यांचा १९६४ मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला ‘वो कौन थी?’ सुपरहिट ठरला. या चित्रपटातील ‘लग जा गले’ आणि ‘नैना बरसे रिमझिम’ ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ही दोन्ही गाजलेली गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती.

    मनोज कुमार यांचे वह कौन थी, पूरब औऱ पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांती हे सिनेमे सुपरहिट ठरले. शहीद सिनेमातील त्यांच्या शहीद भगतसिंहांच्या भूमिकेचे तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केले होते.

    १९६२ मध्ये विजय भट्ट यांच्या ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटाने त्यांना सर्वात मोठे यश मिळाले, जो व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरला. या चित्रपटात माला सिन्हा होत्या. ‘हरियाली और रास्ता’, ‘शादी’ (१९६२) च्या यशानंतर ‘डॉ. विद्या (१९६२) आणि गृहस्थी (१९६३) या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Rupali Chakankar : “भोंदूबाबा प्रकरणाचा मोठा धक्का; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब?”

    March 20, 2026

    Sanjay Raut : “खरात फाइल्स : संजय राऊतांचा दावा – राज्य मंत्रिमंडळातील ९ मंत्री भोंदूबाबाचे भक्त; मुख्यमंत्र्यांच्या कारवाईने धाबे दणाणले”

    March 20, 2026

    Jalgaon : जळगाव क्रिकेट उत्सव: JCL 2026 – पर्व 2; T20 थरार घेऊन येणार, स्थानिक खेळाडूंना सुवर्णसंधी

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.