संतोष देशमुखांच्या मुलाचे आमिरखानकडून सांत्वन
पुणे ( प्रतिनिधी)-
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये हत्या झाली. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी देशमुख कुटुंबीय करत आहेत. आता बॉलीवूड अभिनेता आमिर खानने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
अभिनेता आमिर खानने पुण्यात संतोष देशमुख यांच्या मुलाची भेट घेतली. आमिरने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुखांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान आमिर खाननं देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधला.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आरोपींच्या विकृतीचे फोटो समोर आले होते. हे फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. संतोष देशमुख हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांचा सहकारी वाल्मिक कराडला आरोपी करण्यात आलं आहे.