Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»भरधाव डंपरची ओमनी कारला जबर धडक ; पाच गंभीर जखमी ; सुनसगावाजवळील घटना
    क्राईम

    भरधाव डंपरची ओमनी कारला जबर धडक ; पाच गंभीर जखमी ; सुनसगावाजवळील घटना

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 2, 2024Updated:August 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    भरधाव डंपरची ओमनी कारला जबर धडक ; पाच गंभीर जखमी ; सुनसगावाजवळील घटना-www.saimatlive.com
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव

    भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे भरधाव डंपर आणि ओमनी कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

    याबाबत माहिती अशी की, बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी ओमनी वाहनाने शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी जळगाव येथे काही कामानिमित्त येत होते. त्यावेळेला सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार ही भुसावळ तालुक्यातील सूनसगाव जवळून जात असतांना भरधाव डंपरने त्यांना जबर धडक दिली.

    या भीषण अपघातामध्ये ओमनी कारमधील विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष प्रभाकर बावस्कर (वय ५२), कारकून रामदास देवराम मोरे (वय ५०), सोसायटीचे सेल्समन प्रकाश निना सोनार (वय ४०) यांचेसह चालक कैलास पुंडलिक सुशीर (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत तर नीना कैलास सुशीर (वय ३१) या तरुणाला किरकोळ मार लागला आहे. हा अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी तात्काळ धाव घेवून जखमींना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

    #accident #jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.