नागपूर : वृत्तसंस्था
नागपूरच्या बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी स्फोट झाला असून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणाऱ्या सोलर ग्रुपच्या बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड या आयुध निर्माणीत रविवारी स्फोट झाला. यात ९ कामगारांचा मृत्यू झाला असून यात ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. सोलर ग्रुपद्वारे संचालित इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड ही संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारा देशातील एक मोठी कंपनी आहे.
प्रसिद्ध उद्योजक सत्यनारायण नुवाल संचालित या कंपनीचे बाजारगाव येथे सुमारे २ हजार एकरमध्ये मोठे युनिट आहे. रविवारी बाजारगाव येथील कंपनीच्या सीबीएच २ युनिटमध्ये कार्यरत १२ कामगारांपैकी ९ जणाचा मृत्यू झाला असून सीबीएच २ प्लांटची इमारत उद्धवस्त झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.या घटनेची माहिती राज्याचे माजी गृहमंत्री तसेच विद्यमान आमदार अनिल देखमुख घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मृतांना पाच लाखांची मदत
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांसाठी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
