विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
प्रेरणा मिळण्यासाठी आपल्याला कुठे शोधायला जावे लागत नाही ,आपल्याला आसपासही अशा काही व्यक्ती असतात त्या आपल्याला एखाद्या ध्येयाप्रत घेऊन जाण्यास मदत करत असतात त्या वाटेत येणारया सर्व अडचणींवर मात करतात आणि पुढे जातात अशी माणसं आज आपल्याला मोजकीच दिसून येतात यांना सहजासहजी देवपण आलेले नसते यांनी अनेक काटेरी प्रवास करून टाकीचे घाव सोसलेले असतात कठीण परिस्थितीत कोणत्याही पाश्वभूमीशिवाय नसतांना अभूतपूर्व यश संपादन करत आपापल्या क्षेत्रात आदर्श निर्माण करतात धैयनिष्ठा,प्रामाणिक पणा व सामाजिक बांधिलकी जपत यशस्वी होतात आशा दुर्मिळ व्यक्तिमत्त्वापैकी एक यश यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे कर्तव्यदक्ष खाकी वर्दीतील “आपला माणूस” सुदाम शिरसाठ साहेब होय त्यामुळे आज तरुणांचे हे प्रेरणास्थान बनलेले आहे त्यांच्या कडे पाहून युवकांना आपणही पोलीस दलात जाऊ शकतो असा विश्वास वाटतो
सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सुदाम शिरसाठ साहेब हे पोलीस सहायक निरीक्षक या पदावर कार्यरत असून त्यांच्या आता पर्यंतच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत
सुदाम शिरसाठ यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सिरसाठ वाडी या गावी २५-७-१९८९ साली झाला
माणसाच्या अंगी असलेली जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकत नाही मेहनत केली तर यश हमखास पाहायला मिळतं प्रगतीसाठी शिक्षण हाच एक मोठा पर्याय आहे त्यासाठी परिस्थितीला न जुमानता अभ्यासाची कास धरून ध्येय गाठणे सहज शक्य होऊ शकते हे सिद्ध करून दाखवले आदरणीय सुदाम शिरसाठ साहेबांनी २०११ मध्ये झालेल्या जॉइनिंग नंतर ट्रेनिंग संपवून २०१३ ते २०१६ या तीन वर्षाच्या कार्यकाळात नक्षलवादी भाग असलेल्या गडचिरोली या जिल्ह्यात आपल्या कर्तव्य सुरुवात केली त्यानंतर बीड या ठिकाणी तर आता औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात ते आता दोन वर्षापासून कार्यरत आहेत
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सप्टेंबर २०१९ मध्ये कर्तुत्ववान कर्तव्यनिष्ठ खाकी वर्दीतील आपला माणूस सुदाम शिरसाठ यांनी पदभार घेतल्यापासून या संवेदनशील ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढत अतिशय कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी केली आहे या हद्दीत गुन्हेगारीने तोंड वर काढले होते परंतु कायद्याचा अवलंब करत अनेक मुसक्या आवळल्या ने गुन्हेगारीवर अंकुश आला आहे कायद्यात रहाल तर फायद्यात राहाल असा संदेश देत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असो की बाजूच्या हद्दीत खुनाची घटना असेल या सर्व गुन्ह्यांची उकल करताना अतिशय शिस्तबद्ध तपास यंत्रणा राबवत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत
गुन्ह्यांचा तपास करताना शिस्तप्रिय खाकीचा दबदबा निर्माण करून पोलीस दलाची मान उंचावेल अशा प्रकारचे कार्य केले हे पोलीस स्टेशन अत्यंत संवेदनशील असून चोवीस तास अलर्ट राहावे लागते तसेच तीन तालुक्यांचा केंद्रबिंदू असून अतिशय समयसूचकता दाखवत कायदा आणि सुव्यवस्था याची कोठेही हेळसांड होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन आपले अतुलनीय धैर्य ,धाडस गुन्हेगारांना जेरीस आणण्यासाठी त्यांना पकडण्यासाठी रचला जाणारा सापळा कुठल्याही गुन्ह्याची लवकरात लवकर उकल काढून गुन्हेगारांना शासन करण्यासाठी रचलेली सुरक्षित व्युहरचना नागरिकांचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपल्या जिवाची पर्वा न करता समाजाच्या संरक्षणासाठी तत्पर असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी ठाणेदार सुदाम शिरसाठ साहेब हजर असतात सर्व धर्म समभाव जोपासणारे खाकी वर्दीतील आपला माणूस एक कर्तव्यदक्ष कार्यक्षम कर्मनिष्ठ लोक प्रीती सह गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले यांनी लोकप्रियता मिळवली तर सामाजिक एकात्मतेचा संदेश देत सर्व धर्म समभाव वसा अंगीकारत जातीय सलोखा निर्माण करीत त्यांनी कधीही जाती धर्म लहान-मोठा गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न जुमानता आपल्या कर्तव्यात स्मितभाषी, प्रेमळपणे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यावर काकीचा वचपा बसवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोकप्रियतेचे सह खाकी वर्दीचा दबदबा निर्माण केला आहे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यात ही यशस्वी झाले आहेत चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या आधारे अनेक चोरी खुनी गुन्ह्यांचा त्यांनी सोक्षमोक्ष लावला आहे
या हद्दीतील सर्व गावांमध्ये सर्वधर्मीय सण होळी दीपावली, दसरा, रमजान, बकरीईद, मोहरम, शिवजयंती, भीम जयंती, जागतिक आदिवासी दिन, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, लग्न समारंभ सुख-दुःखात सहभागी होऊन तसेच लहान मोठ्यांना तसेच पत्रकार, समाज सेवक राजकारणी सामाजिक कार्यकर्ते सर्वांना आपलासा वाटणारे खाकी वर्दीतील “आपला माणूस” सुदाम शिरसाठ यांनी अल्पावधीतच जन माणसाच्या हृदयात स्थान मिळवले आहे
ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचे ऋण फेडणे हे आपले अध्य कर्तव्य समजून ते नेहमी सकारात्मक दृष्टीने सर्व समाजासाठी काम करतात
संपूर्ण जग कुरणाच्या विळख्यात सापडले असताना कोरोना नावाचा भयंकर अजगर दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस विळखा घालत होता अशातच कृतिशील विचार खाकीवर्दी त्यांनी रुजवीत माणुसकीचा परिचय दाखवत अनेक गोरगरिबांना मदतीचा हात देऊन आदर्श निर्माण केला सामाजिक बांधिलकी जोपासत माणुसकीचा धर्म निभावत असल्याचे दाखवून दिले संचारबंदी असल्याने भूक-तहान विसरून ते दिवस-रात्र तैनात राहून उन्हाच्या झळा सोसत उन्हामध्ये कर्तव्य निभावणाऱ्या साहेबांनी कर्तव्य महत्त्वाचं आहे हे दाखवून दिले खाकी वर्दीत असतानाही सामाजिक बांधिलकी जोपासत माणुसकीचा धर्म निभावत असल्याचे दाखवून दिले जगाला ग्रासणाऱ्या या संकट प्रसंगी माणुसकीचा धर्म जिवंत असल्याचे यानिमित्त दिसून आल्याने कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी सुदाम शिरसाठ यांच्या संवेदनशील मनातून माणुसकीचा झरा पाझरतो त्यामुळे त्यांच्या कार्याचा सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे या कर्तव्यनिष्ठ खाकी वर्दीतील आपला माणूस सुदाम शिरसाठ साहेबांच्या कर्तव्यदक्षतेला त्रिवार “सॅल्लूट”…!
