मनवेल येथे घरफोडी रोख रक्कमसह सोन्यां चांदीच्या ऐंवज लंपास

0
75

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेले.घरातील व्यक्ती उठल्याचे पाहून चोरटे पसार झाले.या प्रकरणी शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, अरूण कालुसिंग पाटील रा. मनवेल ता.यावल जि.जळगाव हे दोन मुले आणि सुन यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवार २७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता सर्वजण जेवण करून झोपले.मध्यरात्री अज्ञात दोन चोरट्यांनी घराचा कडीकोडा तोडून घरात घुसून अरूण पाटील यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटातुन चोरी केली शुक्रवार २८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास  कपाटाचा खळखळ आवाज आल्याने अरूण पाटील हे झोपेतून जागे झाले तर दोन चोरटे डोक्यात टोपी घालून चोरी करताना दिसून आले.

अरूण पाटील यांना पाहून चोरटे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून पळून गेले.या प्रकरणी अरूण पाटील याचा मुलगा तेजभान अरूण पाटील यांनी सकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यां विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरट्यांनी गावात धनसिंग सोमा पाटील यांचा स्वंयपाक घरातील पेट्या व इतर ठिकाणी शोधा शोध केली असता काहीच हाती आले नाही तेथून सरळ शांताबाई मांनसिंग पाटील यांचा घराचा जवळ गेले असता या महिलेला जाग आली असता श्याम पाटील सर यांना फोन लावत असताना चोरट्यांनी पळ काढला तेथून थेट मा.प.स.सदस्यं अरुण पाटील यांचे बंधू अँड रणजित पाटील यांचा रुम मध्ये शोधा शोध करुन आणि रोख रक्कम सहा हजाराचे दागिने लंपास केले. आज सकाळी फैजपुर येथील डी.वाय.एस.पी.डॉ.सोनवणे, यावल पोलिस निरीक्षक सुधिर पाटील यांनी भेट दिली.व श्वांन द्वारे परीसर पिंजून काढण्यात आला.पुढील तपास पि.एस.आय. जितेंद्र खैरनार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here