प्रजासत्ताक दिना निमित्त रेंभोटा येथे जि प शाळेला प्रिंटर भेट.

0
25
खिर्डी ता रावेर 
प्रजासत्ताक दिनाच्या औचीत्ये साधुन रेंभोटा येथील  ज्ञानेश्वर रामु गाढे यानी जि. प . मराठी शाळेला प्रिंटर झेरॉक्स मशीन भेट दिली असून. रें भोटा येथील इंजीनीयर ज्ञानेश्वर रामु गाढे यांनी आपल्या मोठे बंधू कै.नंदलाल रामु गाढे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही भेट दिली आहे. आज खाजगी शाळे मुळे प्रत्येक गावातील जि.प शाळा ही बंद पडल्या आहे परंतु रेंभोटा  येथील शाळेला दानशूर व्यक्तीकडून देनगी स्वरुपात विवीध व स्तु दान देण्याचे अवाहन प्राथमीक शिक्षीका भाग्यश्री बेंडाळे यांनी केल्यावर गावातील इंजीनीयर ज्ञानेश्वर गाढे यानी अवाहनाला प्रतीसाद देत एक पाऊल पुढे टाकुन आपली शाळा डीजीटल व्हावी या दिशेने पुढे आले व प्रिंटर झेरॉवस मशीन शाळेला भेट दिली. त्या अनुशंगाने त्याच्या मातोश्री भिका बाई रामु गाढे यांच्या हस्ते आज ध्वज रोहणाचे अनावर करण्यात आले व प्रिंटर सुद्धा दान करण्यात आले या ठिकाणी आज त्यांचा येथील सरपंच सपना आनंदा सपकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्राम सेवक  कपीला गावीत, शीक्षक मनोज महाजन . उपसरपंच ज्योती पाटील,सुनिल महाजन,प्रल्हाद गाढे, पंकज वाघ,सुभाष महाजन,योगेश चौधरी,राहुल गाढे,  आनंदा सपकाळे .सुरेश पाटील,कांतीलाल गाढे,पोलीस पाटील विनोद पाटील व  गावातील सर्व मान्यवर उपस्थीत होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here