बोदवड ग्रामीण रुग्णालयातील परिचारीकेच्या हलगर्जीपणामुळे शेलवड येथील रुग्णास दुखापत…

0
16
बोदवड प्रतिनिधी (सुहास बारी) :
               जिल्हाभरासहित तालुक्यात सद्ध्या थंडीची जोरात लाट आहे. अश्यात जनसामान्यांना खाजगी दवाखाने परवडत नाही. पर्याय म्हणुन मोफत उपचारासाठी हातमजुर , गोरगरीब रुग्ण शासकिय रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतात. अश्यावेळी
ग्रामीण रुग्णालयात शेलवड येथील भगवान चौधरी नामक रुग्णाला थंडी व कंबर दुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी एक्सरे काढत त्यांनी दिनांक 06 रोजी इंजेक्शन घेतले. त्यानंतर , त्यांचा डाव्या हाताचा पंजा हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांना इंजेक्शन मुळे बाधा झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यानंतर , सदरील बाधा ‘डायक्लोफिनॅक इंजेक्शन’ च्या औषधामुळे नाही तर सुईमुळे झाली असल्याचे वैद्यकीय अधिक्षक राजेश बार्गळ यांनी सांगितले. त्यामुळे , वैशाली कांबळे नामक परिचारिकेचा हलगर्जीपणा गरीब रुग्णाच्या जिवावर बेतला आहे. पैश्यांअभावी मोफत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात धाव घेणे महागात पडले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात न्युरोलाॅजिस्ट नसल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागणार आहे. सुईमुळे झालेल्या बाधेमुळे डाव्या हाताच्या पंजाचा रक्त प्रवाह बंद झाला आहे. विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी खर्च होणार आहे. त्यामुळे शासकिय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाची चर्चा होत असुन दुष्काळात तेरावा महिना असा प्रसंग घडल्याने सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सदरील प्रकाराबाबत संबंधित रुग्णाकडुन जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार करण्यात येणार आहे. शासन स्तरावरून मदत झाल्यास रुग्णास पुढील उपचार घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
रुग्णाच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे गजानन पाटिल व अमोल व्यवहारे पाठपुरावा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here