बोदवड तहसिल कार्यालयात डंपरचा चेसिस क्रमांक बदलवणे पडले महागात

0
18

बोदवड, प्रतिनिधी । तहसिल कार्यालयात डंपरचा चेसिस क्रमांक बदलवणे महागात पडले असुन वाहन चालक सुरेश भोई व शरद भागवत पाटिल यांच्याविरोधात तलाठी मंगेश पारिसे यांच्या फिर्यादीवरून भादंवि 379 ,420 ,465,468,471,120B , 188 अन्वये बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच अवैध ऊत्खनन व वाहतुक केल्याप्रकरणी 2 लाख 68 हजार 367 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीला लगाम घालण्यासाठी तहसिल कार्यालयाचे पथक गस्तीवर असतांना दिनांक 12 रोजी शेलवड ते सुरवाडे रोडवर पळासखेडा बुद्रुक नजीक  रात्री 9 च्या सुमारास वाळुने भरलेले डंपर एमएच 19 वाय 4464 असे वाहन आढळून आले. तद्नंतर वाहन चालकाला वाळु वाहतुकीची पावती मागितल्यानंतर etp नं. 1932341 ही पावती डिलिव्हरी चलन नंबर STQL16070253140001 003606 सादर केली. सदरील पावतीची महा मायनिंग प्रणालीवर तपासणी केली असता वाळु वैध आढळून आली. परंतु , जीपीएस मॅप नुसार तपासणी केली असता सदरील वाहन निर्धारित रस्त्याने जात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनधारकांना मॅपचे उल्लंघन केले असल्याने सदरचे वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात पुढील कार्यवाहीसाठी दुपारी 10:30 वाजता जमा करण्यात आले. सदरचे वाहन तपासणी कमी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार वायुवेग पथकातील अधिकारी सुनील गुरव हे दिनांक 23 जानेवारी रोजी तपासणीसाठी तहसील कार्यालयात आले. कार्यालय बंद असल्याने वाहनाचे वजन करण्यासाठी वाहनाची चाबी व वाहनचालक किंवा मग उपलब्ध नसल्याने सदरील माहिती तहसिलदार योगेश्वर टोंपे यांना भ्रमणध्वनीवरून देण्यात आल्यानंतर ते कार्यालयात दाखल होत वाहनांची तपासणी करत वाहनाचा क्रमांक MH19Y4464 व चेसीस क्रमांक FNE656812 याचा फोटो तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी काढला.  नंतर दिनांक 24 रोजी सदरच्या वाहनाचे वजन काटा करण्यासाठी तसेच पुढील चाकाचे पंचर काढण्यासाठी चालक व मालक यांची वाट बघितली. परंतु , कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही त्या वेळी परत वाहनाचे मोजमाप करून तपासणी केली असता सदर वाहनाचा क्रमांक MH19Y4464 आढळला परंतु वाहनाचा चेसीस क्रमांक FNE656812 एवजी MB1G3DYC3CRDH1432 असा आढळला तसेच मागील भागात तफावत आढळली. त्यामुळे सदरील वाहनाची बदली झाल्याचे लक्षात आल्यावर अगोदर लावलेल्या डंपर क्रमांक MH19Y4464 त्याचा चेचीस क्रमांक FNE656812 हे चोरुन घेऊन जावुन त्याच्या ऐवजी MH19Y4464 त्याचा चेसीस क्रमांक MB1G3DYC3CRDH1432 हे वाहन लावण्यात आले आहे. तेवढी आरटीओचे अधिकारी सुनिल गुरव यांनी सदरील बाब तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
वाहन चालक सुरेश भोई व शरद भागवत पाटिल यांच्याविरोधात भादंवि 379 ,420 ,465,468,471,120B , 188 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here