बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा नदीत बुडून मृत्यू

0
28

जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पळसोद येथे तापी नदी पात्रात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पळसोद येथील शेतकरी सुपडू बळीराम चौधरी (वय ५४) हे त्यांच्या मालकीचे असलेले बैल धुण्यासाठी गावानजीक असलेल्या तापी नदीवर गेले होते. काठावरच सुपडू चौधरी यांनी आपल्या अंगातील कपडे व बुट काढून ठेवत बैलांना धुण्यासाठी पाण्यात उतरले. बैलांची आंघोळ घालत असतांनाच एक बैल पोहत-पोहत सुपडू चौधरी यांना खोल पाण्याकडे घेवून गेला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौधरी त्याठिकाणी बुडून गेले. सुपडू चौधरी हे तापी पात्रात बैल धुत असतांना पळसोद गावातीलच युवराज वाघ यांना हा प्रकार दृष्टीस पडला. मात्र चौधरी हे पात्रातून बाहेर न आल्याने वाघ यांच्या हा प्रकार लक्षात आला. सदर घटनेची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र आले. सदर घटना पोलीस पाटलांनी तालुका पोलीस स्थानकाकडे कळवली. यावरुन पोलीसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हालवला व घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुपडू चौधरी यांच्या पश्चात पत्नी मंजुबाई, मुलगा अनिल, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here