गॅस कटरद्वारे एटीएम कापून १३ लाखांची रोकड लंपास 

0
11
जामनेर(प्रतिनीधी) पंढरीनाथ पाटील:-  शहरातील पाचोरा रोड वरील आयडीबीआय बँकेच्या एटीएमला गॅस कटरचा वापर करून सुमारे १३ लाख रुपये  अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्यामुळे बँक व्यवस्थापनामध्ये चांगलीच खळबळ माजली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.चोरी करताना चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा बँकेसह एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे
शहरातील पाचोरा रोडवरील गजबजलेल्या भागातआयडीबीआय बँक असून शेजारीच बँकेचे एटीएम आहे.अज्ञात चोरट्यांनी सदर बँकेचे एटीएम कटरच्या सहाय्याने कापून एटीएम मधील १२ लाख ७८ हजार रुपयाची रक्कम लंपास केल्याची घटना दि.२६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून अवघ्या पंधरा मिनिटात चोरट्यांनी एटीएम मधून पैसे चोरून पोबारा केल्याचे दिसत आहे.या घटनेमुळे चोरट्यांनी पोलिसांपुढे एक मोठे आव्हान उभे केले असून प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना तेरा लाखाची सलामी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे,पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. बँकेचे शाखाधिकारी प्रसून परेशनाथ घोष यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटया विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here