जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा महानगर प्रसिद्धी प्रमुख पदी पूजा पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी आ. चंदूभाई पटेल, बीजेपी जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिताताई वाघ, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी उज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस रेखाताई वर्मा, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, दिप्ती चिरमाडे, अध्यक्ष जळगाव जिल्हा महानगर महिला आघाडी यांच्या आदेशानुसार पुजाताई यांची नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
प्रसंगी प्रतिनिधींशी बोलतांना पक्ष्याच्या आदेशानुसार महिलांसाठी समाजकार्य नियमीत करीत राहील. स्त्री ही फक्त चूल व मूल या चाकोरीत न राहता स्त्रीने तिचे अस्तित्व निर्माण करावे, यासाठी नियमित समाजकार्य करत राहील असे नमूद केले. पूजा पाटील यांचे सर्व समाजातून कौतुक होत आहे.