भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला ,विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. ध्वजारोहन ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन भाऊ फालक यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी चेअरमन महेश भाऊ फालक, सचिव विष्णू भाऊ चौधरी, प्रकाश शेठ फालक, संचालक निळकंठभारंबे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, प्रधानाचार्य नीना कटलर , उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ. बी एच बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. एन. ई भंगाळे, उपप्राचार्य डॉ. ए डी गोस्वामी, उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे, पर्यवेक्षक श्रीमती शोभा तळेले, आदी मान्यवर उपस्थित होते.
संविधानाचे करण्यात आले वाचन
ध्वजारोहन करण्याच्या पूर्वी शासकीय आदेशानुसार संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन डॉ. नाडेकर यांनी केले. Covid-19 ची परिस्थिती लक्षात घेता प्राध्यापक वृद्धांसाठी या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थिती देण्यासाठी विशेष व्यवस्था संगणक विभागाच्या मार्फत डॉ. बी .एच. बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. हर्षल पाटील, यांनी केली. एन सी सी चे विद्यार्थी, एनएसएसचे विद्यार्थी, त्यांचे कार्यक्रम अधिकारी, यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आनंद उपाध्याय. कार्यालयीन कर्मचारी वृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.