जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष मा.दिपक सुर्यवंशी आणि अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष साबीर गुड्डू पठाण यांनी जिल्हा कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी अफसर अब्दुल हमीद, सय्यद युनूस सय्यद अमीर तसेच सरचिटणीस पदी वसीम शेख इस्माईल व चिटणीस पदी अब्दुल हमीद अब्दुल रउफ यांची निवड करण्यात आली आहे.
दिनांक २६ जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ, अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष साबीर गुड्डू पठाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी आणि अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष साबीर गुड्डू पठाण यांनी जबाबदारी स्वीकारलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदीच्या अल्पसंख्यांक समाज व युवकासाठी सुरु असलेले उपक्रमात महत्वपूर्ण भूमिका निभावण्यासाठी व जास्तीत जास्त युवकांना त्यांच्या कार्यात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी आश्वासित केले.
अल्पसंख्याक मोर्चा महानगर जिल्हा कार्यकारणीत प्रमुख कार्यकर्त्यांची निवड झाल्याबद्दल अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शैबाज शेख, महानगर जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष साबीर गुड्डू पठाण आणि समाजातील प्रमुख कार्यकर्त व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.