वेळेचे महत्त्व कळाले म्हणून उतरत्या वयातही दीक्षा घेण्याचे दृढ संकल्प – पारसबाई मोदी

0
31

चोपडा, प्रतिनिधी । जिवन क्षणभंगुर आहे. याची प्रचिती आपणास परमेश्वर वारंवार देत असतो तरी मनुष्य लोभाच्या जाळ्यात इतका अडकतो की, तो मरेपर्यंत माझे माझे करत असतो.कोरोना काळात आपलेच आपले होत नव्हते. मनुष्याला आपली खरी किंमत कळाली. तरीही मनुष्य हा आपल्या जीवनात बदल करून घेत नाही.साधूसंत नेहमीच आपणास सूचित करत असतात की, धर्म शिवाय तुमच्या सोबत काहीच येणार नाही त्यांनी जीवनात धर्माचे स्थान, वेळेचे महत्व आणि गुरु आशीर्वादाचे महात्म्य सांगत
त्यांनी आपल्या जीवनाला गुरूच्या आशिर्वादाने कशी कलाटणी मिळाली ते सांगितले. आणि त्याचमुळे वेळेचे महत्त्व कळाले म्हणून उतरत्या वयातही दीक्षा घेण्याचे दृढ संकल्प मी केला आहे.असे विचार सत्कार व सन्मान प्रसंगी श्रीमती पारसबाई मोदी चोपडा येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघ,चोपडा कडून दीक्षार्थी श्रीमती पारसबाई नेमीचंदजी मोदी (मालेगाव ) यांचा सत्कार व सन्मानाचा आयोजन सुधर्म आराधना भवन मध्ये करण्यात आला होता. यावेळी त्यांनी
जीवनात धर्माचे महत्त्व वाढावे म्हणून उपस्थित सभेला कंदमूळातील कोणत्याही एका कंदाचे त्यांनी त्याग करावे असे आवाहन केले व त्यांच्या शब्दाला मान देऊन उपस्थित जनसमुदायने शपथ ग्रहण केली
याप्रसंगी प्रा.शांतीलाल बोथरा,प्रदीप बरडीया, श्रीमती प्रेमलता टाटीया ,श्रीमती प्रभादेवी राखेचा यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष निर्मल बोरा यांनी भजन द्वारे संयमी जीवनाची पुष्टी केली. तदनंतर योगेश मोदी यांनी “आई” या शब्दाची किमया सांगत त्यांच्या जीवनात आई ने ’काय नाही केले’ याचे थोडक्यात वर्णन करत त्यांच्या जीवनातील प्रसंगाला उलगडा करण्याचा प्रयत्न केला.
दीक्षार्थी श्रीमती पारसबाई नेमीचंदजी मोदी यांचे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघाचे अध्यक्ष सुभाषचंद बरडीया व संघपती गुलाबचंद देसरडा,संजय बरडीया आदिंनी मानपत्र देऊन त्यांचे स्वागत केले तर संघातील ज्येष्ठ श्राविका श्रीमती किरणदेवी रमेशचंद बरडीया व वीरमाता श्रीमती कंचनबाई मिलापचंद बरडीया यांनी शाल व माळा देऊन सन्मान केला.
यावेळी मालेगावातील “श्री पारस” चे संचालक प्रशांत मोदी, हेमंत मोदी व योगेश बी मोदींसह सौ. अनिता मोदी,सौ.स्मितल मोदी, सौ.रूपाली मोदी यांचे सत्कारही प्रदीप भाई बरडीया,धरमचंद टाटिया, रसिकभाई खिलोसिया यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील जैन व जैनेत्तर गणमान्य बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश बरडीया यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here