विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
अजिंठाहे जागतिक पर्यटनस्थळ तर आहेच येथे येत असलेल्या पर्यटकांना तसेच पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून काय काय उपाय योजना कराव्या लागतील व येथे धावत असलेल्या बसेस ऐवजी इलेक्ट्रीक बसेस चालविता येईल का या बाबत आम्ही विचार करत असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जगप्रसिद्ध अजिंठा येथील व्ह्यू पाईन्टच्या परिसराची पाहणी दरम्यान केली.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील व्ह्यू पाईन्ट येथे सायंकाळच्या सुमारास भेट देऊन पाहणी केली.या दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की अजिंठा हे जागतिक पर्यटनस्थळ आहे येथे येणाऱ्या पर्यटकांना तसेच पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून काय काय उपाय योजना करता येतील तसेच अजिंठा लेणी ते टी पाईन्ट पर्यंत धावत असलेल्या बसेसच्या ऐवजी इलेक्ट्रीक बसेस चालविता येतील का याबाबत आम्ही विचार करत असल्याचे सांगितले.दरम्यान मंत्री आदित्य ठाकरे यांचे सिल्लोड,अजिंठा व्ह्यू पाईन्ट, अजिंठा असे ठिकठिकाणी कार्यकर्यानी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.अजिंठा व्ह्यू पाईन्ट परिसराची पाहणी करून त्यांचा ताफा अजिंठा टी पाईन्ट कडे रवाना झाला होता.पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,आमदार अंबादास दानवे, जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी निलेश गटणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजुभाऊ राठोड सोयगाव तालूका प्रमुख आबासाहेब काळे, जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, जिल्हा बँक संचालीका तथा नगरसेविका सुरेखाताई काळे, शिवसेना महिला आघाडीच्या सुरेखाताई तायडे, द्रुपदाबाई सोनवणे, नगरसेविका संध्याताई मापारी, नगरसेवक अक्षय काळे, दिलीप मचे यांच्यासह इतर उपस्थित होते
