यावल ( सुरेश पाटील)
यावल तालुक्यात 15 वर्षाच्या मुलीवर 2 अल्पवयीन मुलांकडूनच आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पत्र याबाबत यावल पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच पोलीस पथकाच्या माध्यमातून तात्काळ चौकशी करून अल्पवयीन दोन संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की बुधवार दि.26 जानेवारी 2022 रोजी दुपारी2:30 ते 3 वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन पीडित मुलगी शौचास गेली असता त्याचवेळी दोघं अल्पवयीन मुलांनी पीडित मुलीला बळजबरीने केळीच्या बागेत नेले व त्या ठिकाणी त्यानीं त्या पीडित मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला भादवि कलम 354(अ),376 354,323,294 तसेच बालकांचे लैंगिक गुन्हेपासून संरक्षण कायदा कलम 3/4/5/(ग)6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सौ.सुनिता कोळपकर करीत आहेत दरम्यान अल्पवयीन दोघ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
