चाळीसगाव प्रतिनिधी (मुराद पटेल)
आज दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी शालेय आवारात मा.सरपंच अहिल्याबाई भास्कर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रतन ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सूत्रसंचालन राजेंद्र वाघ सर यांनी केले त्यात त्यांनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील नावे वाचून दाखवली व मान्यवरांच्या हस्ते सदर मुलांचा सत्कार करण्यात आला इयत्ता तिसरीच्या चार मुलांचा ऑनलाइन भाषणात शालेय स्तरावर उत्कृष्ट भाषण केल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले राजेंद्र वाघ यांनी शालेय गुणवत्तेचा आलेख मांडून विविध कार्यक्रमातून शाळा कशी उपक्रमशील झाली याचा नामोल्लेख करून शाळेचे उल्लेखनीय बाबी उपस्थितांसमोर मांडल्या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांनी शाळेच्या मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्त्यांचा आढावा दिला तर यावर्षी शालेय गणवेश अनुदान 375 विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांसाठी आलेले असून शाळेचा पट 525 असल्याने शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी उर्वरित 150 मुला-मुलींना स्वखर्चाने गणवेश दिले कालच चाळीसगाव विकास गटाचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर साहेब यांनी शाळेसाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी कार्यारंभ आदेश दिला त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरपंच अहिल्याबाई सोनवणे उपसरपंच गोरख राठोड व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत संरक्षण भिंतीच्या कामाच्या शुभारंभासाठी आज नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमास बाळासाहेब राऊत आप्पा जाधव भास्कर सोनवणे संतोष सोनवणे पंकज गरुड वाल्मीक गरुड संदीप आवारी संदीप सोनवणे गोकुळ फटांगरे गुलाब पाटील दिलीप कोकणे बंडू चव्हाण योगेश देशमुख जया आवारे व अन्य मान्यवर उपस्थित होते. गोरख वाघ यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती सांगतांना भारतीय संविधान व लोकशाही ही जगात कशी श्रेष्ठ आहे , हे कथन केले , लोकशाही व्यवस्थेत लोकांना स्वतःचा विकास करून घेण्यासाठी संविधान संधी उपलब्ध करून देत असते , त्याच बरोबर श्री.गोरख वाघ यांनी बाला उपक्रमांतर्गत शाळेचे अंतरंग बाह्यांग कशा प्रकारे बदलता येईल , शालेय वातावरण प्रसन्न व बोलके असल्यास विद्यार्थी विकासावर त्याचा कसा सकारात्मक परिणाम होईल हे उपस्थित मान्यवर व नागरिकांना स्पष्ट करून सांगितले , लोकसहभागासाठी आवाहन केले , त्यास लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला व 83 ,811 रुपयांचा लोकसहभाग जमा झाला , व अजूनही इतर लोकांकडून शाळा विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन उपस्थित ग्रामस्थ बंधूनी दिले.शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिरालाल नागमोती गोरख वाघ प्रल्हाद चिंचोले राजेंद्र वाघ प्रदिप पाटील मुन्ना देशमुख सविता वाघ भारती बोरसे गणेश येवले रावसाहेब राठोड निलेश शिंदे याचे सहकार्य लाभले