पोलिस अधीक्षक मुंडेंचे बनावट फेसबुक अकाऊंट प्रतिसाद न देण्याचे आवाहन

0
149

जळगाव ः प्रतिनिधी
एका भामट्याने चक्क पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या अकाऊंटला कोणीही प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन करणारी पोस्ट डॉ. मुंढे यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवली आहे.
अशा प्रकारे अनेक लोकांचे बनावट अकाऊंट तयार करून भामटे त्यावरून भावनिक पोस्ट करून पैसे उकळत असल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. संबंधित व्यक्ती सायबर क्राइम पोलिस ठाण्यात तक्रार करून बनावट अकाऊंट बंद करून घेत असतात परंतु आता या भामट्यांनी थेट पोलिस अधीक्षक डॉ. मुंडेे यांच्या नावाचे अकाऊंट तयार करेपर्यंत मजल मारली आहे. या बनावट अकाऊंटमध्ये प्रोफाइल पिक्चर, बॅकग्राऊंड पिक्चर डॉ.मुंडेंच्या खर्‍या अकाऊंटप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. त्यावरून नागरिक, मित्रांना हे अकाऊंट खरे असल्याचे भासवले जाते आहे.
या बनावट खात्यावरून अनेक लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही जणांना संशय आल्यानंतर त्यांनी थेट डॉ. मुंडे यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. दरम्यान, या बनावट अकाऊंटवर नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. अशा फेक अकाऊंटवरून भामटे पैशांची मागणी करीत असतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रतिसाद न देता काही गैरकृत्य होत असल्यास माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. मुडे यांनी सोशल मीडियातून केले आहे. हे बनावट अकाऊंट बंद करण्यासाठी डॉ. मुंडे यांनी संबंधित विभागास सूचना दिल्या आहेत.
शासकीय अधिकार्‍यांच्या नावाने होतेय फसवणूक
यापूर्वी काही शासकीय अधिकारी, पोलिस दलातील मोठ्या पदांवरील अधिकार्‍यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून भामट्यांनी पैसे उकळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉ. मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here