चाळीसगाव : प्रतिनिधी (मुराद पटेल ):
राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त बी. पी. आर्टस् , एस. एम. ए. सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालय,
एन.एस.एस.विभाग, मतदार साक्षरता मंडळ आणि राज्यशास्त्र विभाग संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात विविध कार्यक्रम
२५ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी ऑनलाइन वेबिणार आयोजित करण्यात आला प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी लोकशाहीच्या सक्षमिकारानाशी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे असून प्रत्येकाणे मतदान जागृती करावी, प्रा. डी. एल. वसईकर यांनी . लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यासाठी सर्वाना मतदार दिनाची शपथ दिली, मा. श्री अमोल मोरे तहसीलदार यांनी सर्व मतदार यांनी सतर्क,सुरक्षित आणि जागरूक राहून सर्वाना मतदार नोदणी करण्याचे आव्हान केले व थीम निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी बनवणे’ विषयी मार्गदर्शन केले, तर मा. श्री.लक्ष्मीकांत साताळकर,एस. डी. ओ. (प्रांत),यांनी लोकशाही संवर्धंनासाठी मतदान हेच अनमोल असून आपणसर्वांनी आपला राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे अध्यक्षीय मनोगतात श्री एन के वाळके अध्यक्ष चाळीसगाव विधी सेवा समिती यांनी आपले मत खूप महत्वाचे असून ते न विकता योग्य तो उमेदवार निवडून लोकशाही बळकट करावी तसेच लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी घोष वाक्य, निबंध आणि व्रकृत्व सहभागी आणि वजेत्या व स्पर्धकांना तसेच निवडणुकीत उत्कृष काम करणाऱ्या कर्मचार्यांना देखील प्रमाण पत्र देऊन मान्यवराच्या हस्ते गौरवण्यात आले आणि १८ वर्षे वय असलेले पूर्ण असलेल्या तरुण मतदानास निवडणूक फोटो ओळखपत्रे दिली प्सदर कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. पी एस बाविस्कर, आय क्यू ए सी समन्वयक व उपप्राचार्य डॉ.अजय काटे व महाविद्यालायातील प्राध्यापक बंधु भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विधी सेवा समितीचे सभासद, व महसूल विभागाचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.गौतम सदावर्ते यांनी तर सूत्रसंचालन प्रा.रविंद्र पाटील व आभार संदेश निकुंभ यांनी केले, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा नितीन नन्नावरे , प्रा दीपक पाटील, प्रा रविद्र बोरसे आणि प्रा नयना पाटील, सचिन मोरे ,गोपाळ लोखंडे यांनी सहकार्य केले