नेहरु युवा केंद्राची यावल येथे युवकांसाठी कार्यशाळा संपन्न….

0
32

यावल (सुरेश पाटील) : नेहरू युवा केंद्र जळगाव व यावल तालुक्यातील शिरसाड येथील आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावल येथे युवकांसाठीची कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेचे उद्घाटन यावल तालुका तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी साहित्यिक अ.फ.भालेराव सर,माळी कोचिंग क्लासेसचे कैलास माळी सर,नेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक तेजस पाटील,पल्लवी तायडे,मुस्कान फेगडे हे उपस्थित होते.यावेळी तहसीलदार महेश पवार यांनी नेहरू युवा केंद्राच्या कामाची स्तुती केली आणि उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेत युवकांचे आरोग्य व सकारात्मक,जीवनशैली, युवकांच्या मनातील देशाप्रती असणारा अभिमान,मला जगायचंय प्रत्येक सेकंड,अमली पदार्थांच्या सेवनापासून युवकांचा बचाव,युवकांचे कर्तव्य आणि जीवन जगण्याची कला अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुक्ताईनगर येथील साहित्यिक अ.फ.भालेराव सर, भालोद कॉलेजचे प्राध्यापक तथा मार्गदर्शक प्रा जतिन मेढे सर, जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे सर्वेसर्वा विनोद विसपुते सर,जळगाव येथील आपण पब्लिकेशनचे सर्वेसर्वा तथा लेखक उत्तम वक्ते, मनोज गोविंदवार सर या मान्यवरांनी या कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन केले.हा संपूर्ण कार्यक्रम कोविडचे सर्व नियम पाळून घेण्यात आला होता.सदर कार्यक्रम नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर सर व लेखापाल अजिंक्य गवळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी डीगंबर चौधरी,अनिकेत सरोटे, पल्लवी तायडे,दिपाली पाटील, हिमांशू नेवे,विशाल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार तेजस पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here