Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»बिपीन रावत यांच्या कन्येला भाजपची ऑफर
    राजकीय

    बिपीन रावत यांच्या कन्येला भाजपची ऑफर

    saimat teamBy saimat teamJanuary 24, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने युद्धपातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र काही पक्षाने जाहीर केल्या नाहीत. उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तर या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली.

    गेल्या महिन्यात तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नीसह लष्करातील ११ अधिकऱ्यांचे निधन झाले. आता रावत यांच्या एका कन्येला भाजप उत्तराखंडच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव भाजपने त्यांना पाठविला.

    बिपीन रावत यांची सेवानिवृत्तीनंतर उत्तराखंड येथे राहण्याची इच्छा नव्हती. त्यांनी डेहरादून येथे घरही घेतली होते.पण त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. यापार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या मुलीला तिकीटची ऑफर दिली आहे. रावत यांना दोन मुली आहेत. त्यापैकी एकीला भाजप तिकीट देणार आहे. मात्र अद्याप निवडणूक लढण्याबाबत त्यांच्या मुलींकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

    दरम्यान काही दिवसापूर्वी स्वर्गिय बिपीन रावत यांचे बंधू कर्नल विजय रावत यांनी देहरादून येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र ते निडणूक लढणार नाही असे त्यांनी अगोदरच जाहीर केले आहे. बिपीन रावत यांची मोठी कन्या कृतिका या मुंबईत राहतात. त्या विवाहित आहेत. तर लहान कन्या तारिणी या दिल्ली उच्च न्यायालयात वकील आहेत. दोघींपैकी एका कन्येला भाजप देहरादून येथील डोईवाला किंवा कोटद्वार विधानसभेचे तिकीट देण्याच्या विचारात आहे.

    उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक १४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. येथील ८१ लाख ४३ हजार ९२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.