Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»थकीत वेतनेत्तर अनुदान तात्काळ अदा करावे
    जळगाव

    थकीत वेतनेत्तर अनुदान तात्काळ अदा करावे

    saimat teamBy saimat teamJanuary 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कार्यकारीणीची मिटींग विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली होती. या मिटींगमध्ये राज्यातील आठही विभागातील खाजगी शिक्षणसंस्था चालक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वप्रथम मागील मिटींगचे ईतिवृत्त मंजुर करण्यात आले. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या समस्यांवरती कार्यकारणीच्या सभासदांनी काही मागण्या ठेवल्यात.
    त्यात सर्वप्रथम शासनाने २०१९-२० व २०२०-२१चे वेतनेत्तर अनुदान खाजगी शिक्षण संस्थांना तात्काळ उपलब्ध करून द्यावे, ११ डिसेंबर रोजी शासनाने शिक्षकेत्तर कर्मचारी भरती करतांना कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने मानधनावरती भरती प्रक्रिया करण्याचा जो निर्णय घेतला तो अध्यादेश तात्काळ मागे घ्यावा,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी,सरळसेवा पध्दतीने पद भरण्याची परवानगी शासनाने संस्था चालकांना द्यावी,केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे ५वी ७वीचे वर्ग माध्यमिक शाळांनाच चालवण्यासाठी देण्यात यावेत,५ ते ७ चे वर्ग जि.प. कडे वर्ग करु नयेत, शैक्षणिक संस्थांच्या जुन्या इमारती ज्यांना ५० वर्ष पुर्ण झाले आहेत, अशा इमारती पाडून बांधण्यासाठी शासनाने बांधकामासाठी निधी द्यावा अशी मुख्य मागणी संस्था चालकांनी केली.
    त्याचबरोबर आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ अदा करावी,२७ जानेवारी पासून सुरू होणार्‍या ५ ते ८ च्या वर्गाच्या शाळा सुरु करण्यासाठी कोरोना निर्मुलन करण्यासाठी व इमारती व परिसर स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर तसेच ऑक्सीमीटर व इतर साहित्य यासाठी सानुग्रह अनुदान द्यावे,सैनिकी व आश्रम शाळेत सेवेत असणार्‍या आदिवासींच्या तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे थकीत वेतन शासनाने तात्काळ अदा करावे अशी मागणीही करण्यात आली.
    राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे हे सुवर्ण महोत्सव वर्ष असून सुवर्ण महोत्सवाचे मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. सर्व मागण्या मंजूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची महामंडळाचे पदाधिकारी भेट घेणार आहेत.
    या मिटींगला सहकार्यवाहक माजी आ.विजयराव गव्हाणे, उपाध्यक्ष अशोक थोरात, बाळासाहेब पाटील, सरकार्यवाहक एस.पी.जवळकर, वाल्मिक सुरासे, रविंद्र फडणविस, गणपतराव बालवडकर, अजित वडगावकर, मिलींदभाई, अशोर मुरकुटे, सुशिलाताई मोराळे, सुधीर पाटील, अरविंद लाठी, अशोक खलाणे आदी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन शिवाजी बनकर व जिल्हाध्यक्ष औरंगाबाद जिल्हा संस्थाचालक संघ यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    2026 Calendar : जळगाव जनता सहकारी बँकेच्या २०२६ च्या दिनदर्शिकेचे विमोचन

    December 19, 2025

    MahaVitaran Employees : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक स्नेहसंमेलनामुळे ‍मिळाली नवी ऊर्जा

    December 19, 2025

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.