सोयगाव नगरपंचायत उमेदवारांची नजर आता नगराध्यक्षाच्या आरक्षणाकडे

0
69

 

विजय चौधरी:-सोयगाव प्रतिनिधी

नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यास उमेदवारच निवडून आलेला नाही त्यामुळे निवडणुकीत तीन वेळा झालेल्या प्रभाग आरक्षण प्रक्रियेत एकमेव अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक प्रभाग राखीव झाला होता त्यानंतर नव्याने झालेल्या आरक्षणात अनुसूचितजाती प्रवर्गासाठी वार्ड न सुटता अनुसूचितजाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी  राखीव वॉर्ड झालेला आहे परंतु नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकडे राखीव झाल्यास उमेदवारा अभावी गोंधळ उडू शकतो त्यामुळे सर्वसाधारण महिला गटाकडे नगराध्यक्ष पद राखीव झाल्यास येथील नगरअध्यक्षपदाचा पेच  मिटेल

सोयगाव नगरपंचायतीच्या सतरा प्रभागाच्या निवडणुकीनंतर आता नगराध्यक्षपदाच्या आरक्षणा कडे लक्ष लागून आहे सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यास चांगला गोंधळ उडणार आहे प्रभाग निहाय आरक्षणात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी एकही प्रभाग आरक्षित झालेला नाही मात्र ५०% जागांच्या निकषानुसार आणि निवडणुकीत आता ओबीसी आरक्षण रद्द झासल्याच्या निर्णयामुळे महिला प्रवर्गासाठी आरक्षण राखीव होण्याचा विषय संपलेला आहे परंतु अनुसूचित जाती महिला उमेदवारच निवडून आलेला नसल्याने नगराध्यक्षपद या प्रवर्गासाठी राखीव झाल्यास निवडणूक विभागालाही पेच निर्माण होणार असून सोयगावच्या नगराध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल

:तरच नगराध्यक्षपदाचा सुटेल प्रश्न:

सोयगाव नगरपंचायतीच्या सभागृहात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या दहा महिला सदस्य निवडून आलेले आहेत सभागृहातील महिला सदस्यांची संख्या पाहता सोयगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे बहुमताकडे वाटचाल केलेल्या शिवसेनेकडे पाच महिला नगरसेविका आहेत त्यामुळे सर्वसाधारण महिला गटासाठी सोयगाव चे नगराध्यक्ष पद राखीव झाल्यास पेच मिटेल असे दिसून येते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here