“ज्या खिर्डी गावातील सदरचे स्थानिक तथाकथित लोक प्रतिनिधीची व शासकीय ग्रामसेवकची पार्श्वभूमी अशी चुकीची समोर येत असेल तर त्या गावा सह परिसरातील अवैध धंदे व शासकीय कारभार दरम्यान समसमानता प्रकारच्या स्थितीत दिसून येतो.तरी या गंभीर परिस्थितीवर कायमचा अंकुश लावणेसाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.”
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्याचे तहसीलदार आणि निंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खिर्डी व परिसरातील जुगार,सट्टा मटका,दारू,वाळू चे अवैध कारभार राजरोसपणे सुरू असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात असून शासनाने नियुक्ती दिलेल्या शासकीय कार्यालयातील अधिकारी मुख्यालय ठिकाणी देखील राहत नसल्याने सर्वसामान्य जनतेचे काम वेळेत होत नसल्याची समस्या अधिक भोकाळलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खिर्डी व परिसरात कायद्याचा धाक न बाळगता जुगार, सट्टा मटका, दारू विक्रीचे धंदे राजरोसपणे चालविले जाते.तसेच जिल्ह्यात वाळू बंदी असताना वाळू माफिया शासकीय कार्यालय उघडण्यापूर्वी व शासकीय कामकाज व कार्यालय बंद झाल्यानंतर संध्याकाळी ६ ते सकाळी ९ पर्यंत अवैध वाळू वाहतूक केली जाते.या नामी शक्कल मांगे यंत्रणेचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे चर्चेत बोलले जात आहे.
तसेच नुकतेच खिर्डी येथे शासन कडून संबंधित ठेकेदारामार्फत अंगणवाडीतील लहान मुलांना व गरोदर मातांना निकृष्ट दर्जाचे पोषण आहार वाटप झाल्याचा प्रकार उघडकीस आल्या नंतर खिर्डी गावातील सन २०१७ मध्ये महिला वर्गाकडून दारूबंदीच्या विरोधात मतदान झाल्याने दारू ची बाटली अळवी झाली असताना येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक,सरपंच व काही तथाकथित सदस्यांनी गावात दारुची दुकान पुन्हा उघडण्या करिता ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा सुगावा न लागू देता परस्पर मनमानी करून बोगस व खोटा ठराव पारित केल्याचा प्रकार देखील उघडकीस झाल्याने या विरोधात येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येत ग्रामपंचायत गाठून ग्रामसेवक यांना केलेल्या खोट्या ठरावाचा जाब विचारून चुकीचे कार्य करणाऱ्या व्यक्ती विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी लावून धरली होती. हे मात्र खरे आहे.