Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»वर्क फ्रॉम होमसाठी हे ब्रॉडबँड प्लान्स आहेत परफेक्ट, यात १५० Mbps पर्यंत स्पीडसह अनेक OTT बेनिफिट्स
    Uncategorized

    वर्क फ्रॉम होमसाठी हे ब्रॉडबँड प्लान्स आहेत परफेक्ट, यात १५० Mbps पर्यंत स्पीडसह अनेक OTT बेनिफिट्स

    saimat teamBy saimat teamJanuary 21, 2022No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    करोनाचा धोका अजूनही पूर्णपणे कमी झालेला नाही. दररोज हजारो करोना बाधित होत आहेत. करोनाचा वाढता धोका लक्षत घेता अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा वर्क फ्रॉम होम करण्यासच सांगितलं आहे. तसेच, अनेक शाळा आणि महाविद्यालये देखील विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईनच घेत आहे. त्यामुळे भारतात ब्रॉडबँड सेवेची मागणी झपाट्याने वाढली आहे. ब्रॉडबँड सेवा प्रदात्यांनी युजर्सना हाय-स्पीड इंटरनेट ऍक्सेस प्रदान करण्यासाठी अनेक ब्रॉडबँड प्लान्सची नवीन श्रेणी देखील आणली आहे. तुम्हीही घरूनच काम करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांच्या ऑनलाइन क्लासेससाठी सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लान्स खरेदी करायचे असतील. तर ही ब्रॉडबँड प्लान्सची लिस्ट नक्की पाहा आणि तुमच्या गरजेनुसार यातील बेस्ट प्लान निवडा. यात बीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लान, एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान, रिलायन्स जिओ सह काही भन्नाट प्लान्सचा समावेश आहे .

     

    करोनाचा धोका अजूनही पूर्णपणे कमी झालेला नाही. दररोज हजारो करोना बाधित होत आहेत. करोनाचा वाढता धोका लक्षत घेता अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा वर्क फ्रॉम होम करण्यासच सांगितलं आहे. तसेच, अनेक शाळा आणि महाविद्यालये देखील विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईनच घेत आहे. त्यामुळे भारतात ब्रॉडबँड सेवेची मागणी झपाट्याने वाढली आहे. ब्रॉडबँड सेवा प्रदात्यांनी युजर्सना हाय-स्पीड इंटरनेट ऍक्सेस प्रदान करण्यासाठी अनेक ब्रॉडबँड प्लान्सची नवीन श्रेणी देखील आणली आहे. तुम्हीही घरूनच काम करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांच्या ऑनलाइन क्लासेससाठी सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लान्स खरेदी करायचे असतील. तर ही ब्रॉडबँड प्लान्सची लिस्ट नक्की पाहा आणि तुमच्या गरजेनुसार यातील बेस्ट प्लान निवडा. यात बीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लान, एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान, रिलायन्स जिओ सह काही भन्नाट प्लान्सचा समावेश आहे.

    Reliance Jio Plans

    reliance-jio-plans

    रिलायन्स जिओ ३९९, ६९९, ९९९ रुपयांचा प्लान: रिलायन्स जिओचा ३९९ रुपयांचा प्लान अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसह ३० Mbps स्पीड आणि ६९९ रुपयांचा प्लान अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसह १०० Mbps स्पीड ऑफर करतो. या दोन्ही प्लानममध्ये तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळणार नाही. त्याच वेळी, ९९९ रुपयांच्या प्लान मध्ये तुम्हाला १५० Mbps स्पीडसह अनलिमिटेड डेटा मिळतो, त्यासोबतच तुम्हाला फ्री कॉलिंग देखील मिळते. या प्लान मध्ये Amazon Prime, Disney Plus Hotstar, Sony Liv, Zee5 आणि Alt Balaji यासह जवळपास १६ अॅप्सचे मोफत सदस्यत्व दिले जाते.

    Airtel 799 Rs Plan

    airtel-799-rs-plan

    एअरटेलचा ७९९ रुपयांचा प्लान: एअरटेलचा ७०० रुपयांचा प्लान एका महिन्यासाठी अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग फायदे देतो. या प्लानमध्ये तुम्हाला १०० Mbps च्या स्पीडवर अनलिमिटेड डेटा देखील मिळेल. याव्यतिरिक्त, Airtel Thanks अॅप आणि Airtel Xstream, Wynk Music आणि Shaw Academy चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहेत. या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुमच्या डेटाच्या गरजा पूर्ण केल्या जातील, तसेच तुम्हाला हायस्पीड इंटरनेटचाही लाभ मिळेल. हा प्लान सर्वच डेटा युजर्ससाठी चांगला पर्याय आहे.

    Airtel 499 Rs Plan

    airtel-499-rs-plan

    एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान: Airtel Extreme Fiber च्या एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅनची किंमत ४९९ रुपये आहे. या ब्रॉडबँड प्लानसह, युजर्सना ४० Mbps स्पीडसह ३.३ TB पर्यंत अनलिमिटेड इंटरनेट मिळते. एअरटेलच्या या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड लोकल आणि ISD कॉलिंगचाही फायदा मिळतो. यासोबत एअरटेल थँक्स बेनिफिटचा फायदाही देण्यात आला आहे. इतकेच नाही तर, यूजर्सला विंक म्युझिक आणि शॉ अकादमीचे सबस्क्रिप्शनही मिळते. युजर्स १-महिन्याच्या HD पॅकसह Xstream बॉक्स देखील निवडू शकतात. एअरटेलच्या ४९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानची वैधता ३० दिवसांची आहे.

    BSNL 779 Rs Plan

    bsnl-779-rs-plan

    बीएसएनएलचा ७७९ रुपयांचा प्लान: BSNL च्या ७७९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ७७९ GB डेटा दिला जात आहे. ज्याचा कमाल वेग १० Mbps आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड २ Mbps पर्यंत घसरेल. याशिवाय, BSNL च्या ७७९ रुपयांच्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देखील मिळेल. या प्लानमध्ये अनलिमिटेड तुम्हाला कॉलिंगसह Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. ज्या युजर्सना चांगल्या डेटाची आवश्यकता असते त्यांच्यासाठी BSNL च्या ७७९ रुपयांचा प्लान एक चांगला पर्याय ठरू शकतो.

    BSNL 399 Rs Plan

    bsnl-399-rs-plan

    बीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लान: तुम्हाला ऑनलाईन क्लासेस आणि work from home साठी अधिक इंटरनेटची आवश्यकता असेल तुम्ही एक चांगला प्लान शोधात असाल तर बीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लान तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. BSNL च्या ३९९ रुपयांच्या प्लान मध्ये ग्राहकांना २०० GB डेटा देण्यात येत आहे. ज्याचा कमाल वेग १० Mbps आहे. तुम्ही २०० GB डेटा पूर्ण वापरल्यानंतर, वेग २ Mbps पर्यंत घसरेल. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री लँडलाईन कनेक्शनही दिले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.