देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीसाठी आणि खास करून उद्धव ठाकरेंसाठी चांगली बातमी आहे. देशात टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचासमावेश आहे. एका सर्वेतून ही मोठी माहिती समोर आली आहे.
कुठल्या मुख्यमंत्र्यांना किती रेटींग मिळाले?
सर्वेत कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती रेटिंग मिळाले यावर मुख्यमंत्र्यांची क्रमवारी ठरली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेलेओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना सर्वेत सर्वाधिक ७१.१ टक्के रिटिंग मिळाले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ममता बॅनर्जींना ६९.९ टक्के, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एम. के. स्टॅलिन यांना ६७.५ टक्के, तर ६१.८ टक्के रिटिंग मिळवत महाराष्ट्राते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांवर आहेत. त्यानंतर ५ व्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना ६१.१ टक्के रिटिंग मिळाले आहे.
सर्वेत टॉप ९ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकच मुख्यमंत्री आहे. तेही आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा आहेत. त्यांना ५६.६ टक्केच रेटिंग मिळाले आहे. आसामसह गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सर्वेत ४० टक्क्यांहून अधिक समाधानकारक रेटिंग मिळाल्याचे सर्वोतून समोर आले आहे.
तर एडीए किंवा भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि बिहार या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ३५ ते ४० टक्केच रेटिंग मिळाले आहे. भाजपची सत्ता असलेल्या हरयाणा, कर्नाटक, पुदुच्चेरी आणि गोवा या ४ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना २७ ते ३५ टक्के रेटिंग मिळाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना २७.२ टक्के रेटिंग मिळाले आहे. ६७ टक्के जणांनी पंतप्रधान मोदींच्या बाजूने कौल दिला आहे. पण प्रमोद सावंत यांच्या कार्यावर ते नाराज असल्याचे दिसून आले आहे. ही भाजपसाठी समाधानाची बाब नसेल. पण भाजपसाठी दिलासादायक बाब उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेशात सर्वोत सहभागी झालेल्या ४८.७ टक्के नागरिकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पसंती दिली आहे.
