जामनेर (प्रतिनिधी) येथील नगरपालीकेने पाच टक्के अनुदानातुन शहरातील दिव्यांगाना मदत वाटपास सुरुवात केली आहे. दी.२०रोजी नगराध्यक्षा सौ. साधना महाजन यांच्या हस्ते प्रातिनीधीक स्वरुपात काहीं दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले.
नगरपालीका दरवर्षी दिव्यांगांना पाच हजाराची मदत करत असते. आज प्रणाली झाल्टे, सना कौसर अब्दुल, आफरीन बी अशफाक शाह, कल्पेश काटोले व अजिंक्य टहाकळे यांना नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.या वेळी गटनेते डॉ प्रशांत भोंडे, उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील, नगरसेवक बाबुराव हिवराळे, अतीष झाल्टे,जितू पाटील, उल्हास पाटील , भगवान सोनवणे यांच्या सह नगरसेवक मुख्याधीकारी चंद्रकांत भोसले , उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे अपंग संघटनेचे पदाधीकारी व डिव्यांग बांधव उपस्थीत होते.
